''सुधागड तालुक्यात 70 लाखांपेक्षा अधिक रुपयांची विकासकामे होणार''

''सुधागड तालुक्यात 70 लाखांपेक्षा अधिक रुपयांची विकासकामे होणार''

पाली : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुधागड तालुक्यातील विकासकामाकरीता तब्बल 70 लाखाहुन अधिक निधी उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील या विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

सुधागड तालुक्यातील दुर्गम भागासह आदिवासीवाड्यांना जोडणारे रस्ते सुस्थितीत व दर्जेदार असावेत याकरीता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. या रस्त्याकरीता निधी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल यांच्या पुढाकारने व जि.प अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या माध्यमातून पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुधागड तालुक्यातील विकासकामाकरीता तब्बल 70 लाखाहुन अधिक निधी उपलबद्ध झाला आहे. त्याद्वारे विविध विकासकामे केली जाणार आहेत.

या कामांचे भूमिपूजन जि.प. अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सुधागड तालुक्यातील दौ-यात आदिती तटकरे यांनी आदिवासीबांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या अडचणी व समस्या समजून घेतल्या.

सुधागड तालुक्याचा सर्वांगिण व शाश्वत विकास घडवून आणण्यास कटिबध्द असल्याची ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली. येत्या काळात लोकाभिमुख व जनकल्याणकारी कामांना अधिकाधिक प्राधान्य देवून गावागावात विकासाची गंगा आणुया असे देखील तटकरे म्हणाल्या.  यावेळी गिता पालरेचा यांनी सुधागड तालुक्यात विकासकामांच्या बाबतीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अव्वलस्थानी असल्याचे सांगितले.   
     यावेळी रा.जि.प अध्यक्षा आदिती तटकरे, पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा, पाली सुधागड पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, रा.कॉ. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ग.रा.म्हात्रे, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, सुधागड तालुका उपाध्यक्ष राजू कानडे, सुधागड तालुका महिला अध्यक्षा सुजाता भोईर, सरचिटणीस सुनिल राउत, माजी अध्यक्ष यशवंत पालवे, दिपक पवार, शिळोशी सरपंच साधुराम साजेकर, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. दनंजय धारप,  आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ही विकासकामे,  हा निधी
भार्जे अंतर्गत रस्त्याकरीता 10 लाख निधी (सन 2017-18), पेडली नवघर रस्त्यासाठी 10 लाख निधी, करचंडे रस्त्यासाठी 5 लाख निधी, मुस्लीम समाज पाली कब्रस्थान येथे वॉल कंपाउंड बांधणेकामी 5 लाख निधी, बल्लाळेश्वर मंदीर रस्ता ते झापाळे तळे परिसर सुशोभिकरण 5 लाख निधी, पेडली आसरे (विरेश्वर देवस्थान) रस्त्यासाठी 10 लाख निधी, पेडली नवघर रस्त्यासाठी 10 लाख निधी, जांभळा आदिवासीवाडी साकव बांधणे 8 लाख निधी, भैरव वाघोशी ते कुंभारघर रस्त्यासाठी 15 लाख निधी इतका भरीव निधी उपलब्ध झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com