जो तो म्हणतो.. 'कार्यकर्ते अामचेच..!'

अमित गवळे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

पाली : जिल्ह्यात १६ ऑक्टोबरला २४२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. यावेळी सर्वच पक्ष अाप-आपले कार्यकर्ते जुळवून ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. कार्यर्त्यांचे अाणि पदाधिकार्यांचे या पक्षातून त्या पक्षात जोरदार स्थलांतर सुरु आहे. त्यामुळे अाले गलेले कार्यकर्ते अामचेच असल्याचा छातीठोक दावा नेते मंडळी करत आहेत.परिणामी कार्यकर्ते ओळखतांना संभ्रम निर्माण होत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गावा-गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ आपल्या बाजुकडे ओढावेत यासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सी खेच चालली आहे. या पार्श्वभूमीवर विवीध अाश्वासने व प्रलोभने देवून इतर पक्षातील कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ अापल्या पक्षात खेचले जात आहेत. मात्र काही वेळा एका पक्षातून दुसर्या पक्षात दाखल झालेले कार्यकर्ते बर्याच वेळा आपल्या स्वगृही किंवा अाणखी तिसर्याच पक्षात परतत आहेत.

परिणामी हे कार्यकर्ते कसे अामचेच अाहेत याचा छातीठोक दावा पक्षातील नेते मंडळी करतांना दिसत आहेत. काही वेळेला हे स्थलांतरीत कार्यकर्ते नेत्यांसाठी व उमेदवारांसाठी डोकेदुखी सुद्धा ठरत आहेत.कार्यकर्त्यांच्या अागमनाने पक्षाची ताकद किती वाढली अाहे हे दाखविले जाते. परंतू हेच कार्यकर्ते दुसर्या पक्षात दाखल झाल्यावर मात्र नेत्यांची चांगलीच नाचक्की होत आहे.

मग पुन्हा हे गेलेल कार्यकर्ते अापल्या गोटात दाखल करण्यासाठी नेत्यांची धडपड सुरु होत आहे.निवडणूकी पर्यंत तरी कार्यकर्ते टिकून राहावेत यासाठी जो-तो नेता व उमेदवार कसरत करत आहेत. त्यासाठी पार्ट्या, जेवणावळ्या उठविल्या जात आहेत. काही वेळेला एक गठ्ठा मतदानासाठी रस्ते, समाजमंदिर, विहिर बांधू नळपाणी, सांडपाणी व्यवस्था करु अशी विकासाची अाश्वासने किंवा गाजर देखिल दिली जात आहेत. या सर्व खटाटोपात कार्यकर्त्यांची मात्र चांगली चंगळ होतांना दिसत आहे.

Web Title: marathi news marathi websites Pali News Raigad News Grampanchayat Elections