खांडसई अाणि कासारवाडी झाली पाणीदार!

अमित गवळे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पाली : सुधागड तालुक्यातील खांडसई अाणि कासारवाडी येथील ओढ्यावर नुकतेच बंधारे बांधण्यात आले. सरपंच उमेश यादव यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी लोकसहभागातून हे बंधारे बांधले आहेत.यामुळे येथील पाणी प्रश्न मार्गी लागून भूगर्भजलात वाढ होणार आहे.

खांडसई व कासारवाडी गावात वर्षानुवर्ष उन्हाळ्यात गंभीर पाणी टंचाई भेडसावते. यामुळे येथील जलस्त्रोत टिकवून भूगर्भजल वाढवावे, ही कल्पना सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच उमेश यादव यांना सुचली.

त्यानुसार त्यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मिळून खांडसई अाणि कासारवाडी येथील ओढ्यावर बंधारा बांधला. या कामासाठी स्थानिक अादिवासींनीदेखील मौलिक सहकार्य केले.

पाणी अडविल्याने गावाकर्यांचा तसेच गुरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच भूजलभरणा वाढणार आहे. बंधारा बांधतेवेळी सिद्धेश्वर ग्रामपंचायत सदस्य नथुराम चोरघे, शिपाई गणेश महाले, युवासेना पेण-सुधागड-रोहा विधानसभा समन्वयक अाशिष यादव यांच्यासह गणेश सावंत, दिपक जाधव, अनंता साळस्कर, मोहन, किरण, माऊली अादिंसह ग्रामस्थ तसेच अादिवासी वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रत्येकांने मोठ्या मेहनतीने बंधारा बांधण्याचे काम केले अाणि बंधारा योग्य प्रकारे पूर्ण केले.

ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व गावे व अादिवासी वाड्या-पाड्यांवरील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांसह विवीध सामाजिक संघटना व संस्थांचे सहकार्य घेणार आहे. योग्य नियोजन व व्यवस्थापनाने हा प्रश्न नक्कीच मार्गी लागू शकतो.ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या या कामाबद्दल त्यांचे मनःपुर्वक अाभार!
- उमेश गोविंद यादव, सरपंच, ग्रूप ग्रामपंचायत सिद्धेश्वर