पालीतील 74 वर्षांच्या विजय धारीयांची रक्तदानाची इच्छाशक्ती

Pali
Pali

पाली (रायगड) : माझे वय 47 वर्ष आहे...त्यामुळे मला रक्तदान करु द्या! मला रक्तदान करायचे आहे. असा संवाद सुरु होता रविवारी (ता. 21) पालीतील रक्दान शिबीरात. येथील 74 वर्षीय जेष्ठ नागरीक विजय धारीया यांनी रक्तदानासाठी आयोजक, डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे रक्तदानाचा हट्ट धरला होता. याद्ववारे रक्तदानाची दुर्दम्य इच्छा शक्ती दाखवून तरुणांमसमोर देखील त्यांनी आदर्श घालून दिला.

बापुजी मित्र मंडळ सिद्धेश्वर बू. व एम. जी. एम. रुग्णालय कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गुजराती समाज हॉलमध्ये रविवारी (ता. 21) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्यावरुन जाताना विजय धारीया यांनी बाहेरील बोर्ड वाचून आत प्रवेश केला. त्यांनी संबधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सांगितले की मला रक्तदान करायचे आहे. परंतू त्यांच्या शरिरावरुन वय लक्षात आल्याने तुम्ही रक्तदान करु शकत नाही असे त्यांना सांगण्यात आले. मला रक्तदान करायचे आहे…. डॉक्टर तुम्हाला कुठे माझे वय माहित आहे. माझे वय 47 वर्ष आहे...त्यामुळे मला रक्तदान करु द्या! काका तुम्ही वय लपवत आहात, तुमचे वय जास्त आहे. तुम्हाला रक्तदान करता येणार नाही. अशी समजूत डॉक्टर, कर्मचारी व आयोजकांनी काढली. तरी सुद्धा विजय धारिया रक्तदानाच्या हट्टावर अडून बसले. ते म्हणाले हो माझे वय 46 च्या उलट 74 आहे! पण मला रक्तदान करायचे आहे. हे संभाषण सुरु असताना इतर दाते व तरुण देखिल तिथे जमा झाले. विजय धारिया यांची रक्तदानाबाबतची कळकळ आणि जागरुकता पाहुन सर्वच जण अचंबित झाले होते.

डॉक्टरांनी त्यांना सांगितले की वयाच्या साठीनंतर रक्तदान करता येत नाही. या वयात रक्त लवकर वाढत नाही. बिपीचा त्रास असतो अशी असंख्य कारणे असतात. त्यामुळेच असे करणे खुपच धोकादायक असते. हे सर्व सांगितल्यावर धारिया काकांनी आपला पवित्रा सोडला. पण तिथे आलेल्या सर्वांसाठी रक्तदानाचे महत्व त्यांनी विषद केले. अनेक तरुणांना देखील त्यांच्या या कामाचा हेवा व आदर्श वाटला. काहींनी तर यावेळी त्यांचे फोटो काढून फेसबुक व व्हॉट्सअॅप वर व्हायरल सुद्धा केले. 

प्रत्येकाने आवश्य रक्तदान केले पाहीजे. तरुणांनी तर स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे. या वयात रक्तदान करता येत नाही याची खंत आहे. परंतू रक्तदानासाठी प्रबोधन व जनजागृती करु शकतो. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी चांगले काम करण्याची इच्छ आहे. नुसता पैसा असुन उपयोग नाही तर पैसे योग्य त्या समाजोपयोगी कामासाठी वापरता आले पाहीजेत, 

विजय धारिया यांनी सांगितले. तरुणांना देखिल लाजवेल अशी दुर्दम्य इच्छा शक्ती त्या दिवशी धारिया काकांमध्ये पहायला मिळाली. आम्हा तरुणांना सुद्धा त्यांच्या कामाचा हेवा वाटत आहे. त्यांचे हे काम भावी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादाय़ी व आदर्श आहे. त्यांच्या कार्याला सलाम, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे सुधागड तालुका अध्यक्ष ललित ठोंबरे यांनी व्यक्त केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com