अादिवासीवाड्यांवर कपडे व खाऊचे वाटप करुन शिवजयंती साजरी 

Pali
Pali

पाली (रायगड) : शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी मिरवणूका निघतात. काही ठिकाणी गडकिल्ले मोहिमा अाखून किल्यांची स्वच्छता केली जाते. परंतू येथील "एक संघर्ष समाजसेवेसाठी" या गृपमधील सदस्यांनी अादिवासीवाड्यांवर कपडे व खाऊचे वाटप करुन रयतेच्या राजाला खरी मानवंदना दिली अाहे.

या ग्रुपमधील सदस्य अॅड. नरेश शिंदे यांनी फेसबुक व या ग्रुपवर अशा प्रकारे शिवजयंती साजरी करण्याची संकल्पना मांडली. अनेकांना ही संकल्पना अावडली. मग सोशल मिडियावर सगळ्यांना साद घातली गेली. अन बघता बघता अनेक लोकांनी अापल्या न वापरातील चांगले कपडे "एक संघर्ष समाजसेवेसाठी" या गृपच्या सदस्यांकडे अाणुन दिले. अनेकांनी बिस्किटचे पुडे, केळी व इतर खाऊ देखिल दिला.

सोमवारी (ता.१९) शिवजयंतीला सुधागड तालुक्यातील चिखलगाव, कुंभारशेत, पिलोसरी, घपकी, उद्धर व खवली या अादिवासीवाड्यांवर जाऊन कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रुपचे ५०-६० तरुण सदस्य पदरमोड करुन अापअापल्या गाड्या घेवून अादिवासी वाड्यांवर जावून वाटप करत होते. खऱ्या अर्थाने उपेक्षित अाणि दिनदुबळ्यांसाठी अायुष्य वेचलेल्या बहुजनप्रतिपालक महाराजांना दिलेली ही सुज्ञ मानवंदना अाहे.

काही दिवासंपुर्वीच या ग्रुपच्या सदस्यांनी येथील शिवाजी महाराज स्मारकाची साफसफाई, रंगरंगोटी व शुशोभिकरण करुन स्मारकाचा कायापालट केला अाहे. पालीतील मधल्या अाळीतील तलाव साफ करुन सुशोभिकरण केला आहे. पालीतील तलाव स्वच्छ व सुशोभित करणे, हटाळेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण, प्राथमिक अारोग्य समस्या मार्गी लावणे, स्वच्छता अादी विषय सध्या ग्रुपने हाती घेतले आहेत.

समाजसेवेचे ध्येय अामूचे..
"एक संघर्ष समाजसेवेसाठी" या ग्रूपमध्ये पालीतील होतकरु व सामाजिक जाण असलेले सुज्ञ तरूण व नागरिक सहभागी झाले. विषेश म्हणजे हा गृप राजकिय पक्ष विरहित असुन यामधील सदस्यांनी केवळ एक सुज्ञ व जाणकार नागरीक म्हणून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत हे नियम घालून दिले आहेत. कोणत्याही राजकीय नेते व पक्षाचा आधार न घेता पालीच्या विकासाला हातभार लावायला हे सदस्य सज्ज झाले अाहेत. ते असेच वेगवेगळ्या विषयात हात घालुन कामे मार्गी लावून गावाचा विकास साधनार आहेत. असा प्रकारे सोशलमिडियाचा प्रभावी व विधायक वापर करुन ग्रामिण भागातील तरुण व नागरीक अापल्या गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांना सर्वच स्तरातून पाठिंबा व सहकार्य मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com