बनावट स्वाक्षरी प्रकरणी ग्रामसेवकावर कारवाईकरीता केलेले उपोषण स्थगित

Pali
Pali

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीत झालेल्या मासीक सभेच्या इतिवृत्तात तत्कालीन ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचाची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर या अपंग व्यक्तीने केला आहे. संबंधीत ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरीता गजानन वाडेकर रा. करंजघर- विठ्ठलवाडी हे सोमवारी (ता.5) पाली पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. लेखी आश्वासनानंतर मंगळवारी (ता.6) वाडेकर यांनी आपले उपोषण स्थगित केले.

पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनपत्रात नमूद करण्यात आले आहे की, गजानन वाडेकर यांच्या तक्रारी अर्जा प्रकरणी सदर स्वाक्षरीची सत्यता पडताळणी साठी मुख्य शासकीय दस्ताऐवज परीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग पाषाण पुणे यांच्याकडे कार्यालयाचे पत्र जा.क्र/पसंसू/वशी/ग्राम/८११/२०१८ दिनांक ०३-०३-२०१८ अन्वये सादर करण्यात आले आहे.

सदर प्रकरणाची चौकशी महिनाभरात कण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. चौकशी अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. या लेखी पत्रानंतर वाडेकर यांनी उपोषण स्थगित केले. यावेळी गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, उपोषणकर्ते गजानन वाडेकर यांच्यासह वसंत टाकळेकर, एस. एस. कवीतके, माजी सरपंच सुलभा पवार, चंद्रकांत टाकळेकर, सदाशिव नाडकर, अरुण खराडे, गणेश यादव, रमेश वाडेकर, रुपेश कारेकर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामसेवकाच्या बनावट स्वाक्षरी प्रकरणाची जलद चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे लेखी आश्वासन गजानन वाडेकर यांना यापुर्वी पंचायत समिती कडून देण्यात आले होते. परंतू चार महिण्याचा कालावधी उलटून गेला तरी शासन व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने गजानन वाडेकर यांनी आपल्या मागणीच्या पुर्ततेसाठी पुन्हा एकदा उपोषणाचा पावित्रा घेतला होता.  या प्रकरणा संदर्भातील वाडेकर यांचे हे तिसरे उपोषण होते.   

खवली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एस.व्ही.चौकर यांनी 24 मार्च 2015 रोजीच्या मासिक सभेतील इतिवृत्तात तत्कालीन सरपंच सुलभा पवार यांची खोटी सही केल्याचा आरोप वाडेकर यांनी केला आहे.  या संदर्भात वाडेकर यांनी 21 मार्च 2016 व 06 नोहेंबर 2017 ला ग्रामसेवकावर कारवाई होण्याच्या मागणीच्या अनुषंगाने उपोषण केले होते. या बरोबरच अनेकदा तक्रारी अर्जाद्वारे ग्रामसेवकावर कारवाई होण्याची मागणी केली होती. परंतू सुस्त प्रशासन या प्रकरणी दुर्लक्ष करीत असून वेळ काढूपणाची भुमिका घेत असल्याने अखेर पुन्हा एकदा गजानन वाडेकर पाली पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com