इंटरनेट 'डिस्कनेक्ट' झाल्याने परीक्षेत गोंधळ

अमित गवळे
सोमवार, 18 डिसेंबर 2017

रायगड : महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षक अभियोग्यता अाणि बुद्धिमत्ता चाचणी (टेट)सुरु केली आहे. परंतु रविवारी (ता.१७) कर्जत तालुक्यातील दहिवली येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयात ही परीक्षा सुरु असताना इंटरनेट गुल झाल्याने मोठा गोंधळ उडाला.रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी व नातेवाईकांच्या उद्रेकामुळे अखेर पुनर्रपरीक्षा घेण्याचा निर्णय झाला.

सायंकाळी ४ ते ६ या वेळेत अायोजित परीक्षेत शेवटची वीस मिनिटे इंटरनेट विस्कळित झाले होते. उत्तरावर क्लिक करुनही उत्तर स्विकारले जात नव्हते. परीक्षेचा वेळ मात्र कमी होत होता. अखेर शेवटची महत्वाची बारा ते पंधरा मिनिटे शिल्लक असताना इंटरनेट पूर्णपणे गेले. इंटरनेट सर्व्हर डाऊन झाले अाहे असे सुरवातीस पर्यवेक्षकांकडून सांगण्यात आले. परंतु अर्धा तास उलटून गेल्यावर काय झाले हे पाहण्यासाठी परीक्षार्थी बाहेर पडू लागले. घडला प्रकार काय झाला हे कोणीही त्यांना सांगत नव्हते. नेट चालू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची मात्र धाववळ सुरु होती.परंतु तिकडे दूरवरुन अालेले विद्यार्थी अाणि त्यांच्या पालकांची मात्र मोठी घालमेल सुरु होती.

त्यांना कुठल्याच प्रकारे समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. अखरे दीड दोन तासांनंतर मात्र विद्यार्थी व पालकांचा संयम संपला. रात्री सव्वाअाठनंतर इंटरनेट अाल्याने काॅलेज प्रशासनाने दुसऱया ठिकाणी परीक्षा घेण्यास सुरवात केली. परंतु रात्री उशिर झाल्याने व पुन्हा परीक्षा देण्याची मानसिकता नसल्याने परीक्षार्थीनी पुनर्रपरीक्षा घेण्याची मागणी केली. यावेळी अामदार सुरेश लाड यांनी मध्यस्थी केली. अखेर ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय झाला व सोमवारी (ता.१८) साडेबारा वाजता ही परीक्षा घेण्याचे ठरले. अशा स्वरुपाचे मेसेज व फोन काॅल परीक्षार्थींना रात्री उशिरा देण्यात आले.

Web Title: marathi news raigad news local internet disconnected in exam