भिमा कोरेगावच्या भ्याड हल्ल्याचे रायगडात तीव्र पडसाद
पाली : भिमा कोरेगावच्या शौर्यदिनी झालेल्या हल्ल्याने समस्त बहुजन समाजात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी (ता.2) संपूर्ण रायगड जिल्ह्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सुधागड तालुक्यातील परळी, पेडली, पाली या मोक्याच्या व मोठ्या बाजारपेठेतून भव्य निषेध रॅली काढण्यात आली. सुधागडात परळी भिमनगर येथील बुध्दविहारात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन निषेध रॅली काढण्यात आली. घोषणा देत, धम्मध्वज व निळे झेंडे हाती घेवून रॅली काढण्यात आली.
पाली : भिमा कोरेगावच्या शौर्यदिनी झालेल्या हल्ल्याने समस्त बहुजन समाजात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी (ता.2) संपूर्ण रायगड जिल्ह्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सुधागड तालुक्यातील परळी, पेडली, पाली या मोक्याच्या व मोठ्या बाजारपेठेतून भव्य निषेध रॅली काढण्यात आली. सुधागडात परळी भिमनगर येथील बुध्दविहारात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन निषेध रॅली काढण्यात आली. घोषणा देत, धम्मध्वज व निळे झेंडे हाती घेवून रॅली काढण्यात आली. बुधवारी सुधागडात पाली परळी व पेडली बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सुधागड तालुक्यातून भिमा कोरेगावच्या शौर्यदिनी मानवंदना देण्यास गेलेल्या अनेक वाहनांवर देखील दगडफेक झाली. यामध्ये भगवान वाघमारे व संजय साळुंके यांच्यासह अनेक तरुण जखमी झाल्याने या भ्याड हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक व्हावी व या हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी दिलीप जाधव, दिपक पवार, महेंद्र गायकवाड, रि.पा.इं. सुधागड तालुकाध्यक्ष राहूल सोनावळे, रिपब्लीकन सेनेचे सुधागड तालुकाध्यक्ष मंगेश वाघमारे, भगवान शिंदे, रविंद्रनाथ ओव्हाळ, के. टी. गायकवाड, दिपक गायकवाड, राजेश नाना गायकवाड, धम्मशिल सावंत, सुधागड तालुका बौ.पं.म.क.महिला अध्यक्षा रोहिणी जाधव, नुतन शिंदे आदिंसह भिम अनुयायी, बहुजन समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या उपस्थीतीत सर्वत्र चोख पोलीस बंद ठेवण्यात आला होता.