पाच मिनिटांत वॅक्स तंत्राने रेखाटले छत्रपतींचे अप्रतिम चित्र

Shivaji Maharaj
Shivaji Maharaj

पाली : शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकावेळी देशातील सर्व नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक घालण्यात आला होता. प्रसिद्ध चित्रकार प्रकाश पाटिल यांना यावर्षी डोळ्यासमोर महाराजांचा राज्याभिषेक दिसला. मग कल्पना सुचली,की आपण नदी किनारी जाऊन दूधरुपी रंगाच्या अभिषेकांनी आपल्या राजाचे चित्र साकारावे! त्याप्रमाणे त्यांनी अवघ्या पाच मिनिटांत वॅक्स तंत्राने महाराजांचे अप्रतिम चित्र रेखाटून महाराजांना अनोखी मानवंदना दिली.

सध्या यु ट्युबवर या पेंटिंगचा व्हिडिओ खुप गाजत आहे. नवीन पनवेल येथे राहणारे प्रकाश पाटील हे अांतराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आहेत.भारतासह परदेशात त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरते. शिवजयंतीचे औचित्य साधून व महाराजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न असल्याचे प्रकाश पाटील यांनी सकाळला सांगितले. अशा प्रकारे पेंटिंग करण्याची कल्पना प्रकाश पाटील यांनी अापला पुतण्या कुणाल पाटील याला सांगितली त्याला देखिल हि अनोखी कल्पना खुप अावडली. मग साहित्य घेवून दोघेजण पनवेलच्या गाढी नदीकिनारी पोहचले. काळ्या टिंटेड कागदावर काळ्या वॅक्सने चित्र रेखाटून त्यावर पांढरा पोस्टर कलर ओतून प्रकाश पाटील यांनी अवघ्या पाच मिनिटांत वॅक्स तंत्रांने महाराजांचे अप्रतिम चित्र रेखाटले. कुणालने याचा संपुर्ण व्हिडिओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडीयो युट्युबर टाकण्यात आला अवघ्या काहि दिवसांत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला. त्यास खुप प्रसिद्धी मिळात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, माझे आराध्य दैवत. आत्ता पर्यंत महाराजांची असंख्य चित्रे मी रेखाटली अाहेत. शिवजयंती निमित्त महाराजांपुढे नतमस्तक होऊन त्यांना अशा पद्धतीने मानवंदना दिली आहे. चित्र काढण्याची हि पद्धत अवघड नाही पण चित्र खूप महत्त्वाचे आहे, बाकी तंत्र सामान्य आहे. विशेष करून विदयार्थ्यांसाठी हे खूप उपयुक्त तंत्र आहे.
- प्रकाश पाटील, प्रसिद्ध चित्रकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com