सकाळ चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला

Sakal-drawing-competition
Sakal-drawing-competition

पाली : विदर्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व कल्पनेच्या पंखांना उंच भरारी घेण्यासाठी ‘सकाळ चित्रकला’ स्पर्धेचे आयोजन केले जाते. रविवारी (ता.१७) होणाऱ्या ३२व्या चित्रकला स्पर्धेसाठी स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे सज्ज झाली आहेत. पालीतील स्पर्धेचे केंद्र ग. बा. वडेर हायस्कूलच्या दर्शनी भागात चित्रकला स्पर्धेची माहिती देण्यासाठी मोठा फलक लावण्यात आला आहे. 

स्पर्धा विनामूल्य होणार असून चित्र काढण्यासाठी कागद व विषय सकाळकडून पुरविला जाईल. रंगसाहित्य मात्र प्रत्येकाने सोबत आणावे. स्पर्धेसाठी अ, ब, क, ड असे चार गट आहेत. 'अ' गटात इयत्ता पहिली व दुसरी, 'ब' गटात इयत्ता तिसरी व चौथी. या स्पर्धेची वेळी सकाळी साडे अकरा ते साडेबारा आहे. 'क' गटात इयत्ता पाचवी ते सातवी आणि 'ड' गटात इयत्ता आठवी ते दहावी व या स्पर्धेची वेळ सकाळी नऊ ते साडेदहा अशी आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील स्पर्धकांचा या स्पर्धेसाठी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. 

पाली स्पर्धेचे केंद्र ग. बा. वडेर हायस्कुलचे कला शिक्षक चंद्रकांत देवरे यांनी हा आकर्षक फलक तयार केला आहे. देवरे सर आणि जानकीबाई लिमये शाळेचे शिक्षक शेखर राऊत यांनी सांगितले की, स्पर्धेसंदर्भात नाव नोंदणी करण्यासाठी विदयार्थ्यांनी मागील अनेक दिवसांपासून विचारणा करुन नोंदणी केली आहे.

मागील स्पर्धेत सुधागड तालुक्यासह रोहा, नागोठणे, माणगाव, मुंबई, सुकेळी येथील अनेक शाळांतील विदयार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या वर्षी सुद्धा असा उदंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेसाठी सु.ए.सो.चे अध्यक्ष वसंत ओसवाल व ग.बा.वडेर हायस्कुलचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, पालक व हितचिंतकांची अमूल्य मदत लाभणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com