दिवसाढवळ्या शाळकरी मुलीला पळविले

Marathi News_Kokan_The school girl escaped
Marathi News_Kokan_The school girl escaped

पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यात एका शाळकरी मुलीला शुक्रवारी (ता.8) सकाळी पळवून नेले. ही मुलगी पाली येथे शाळेत जाण्यासाठी आली होती. त्यावेळी तिला अज्ञात इसमाने पळवून नेले.

सुधागड तालुक्यातील अडुळसे येथे राहणारी पंधरा वर्षीय शाळकरी मुलगी शुक्रवारी (ता.१०) सकाळी 10 वाजताच्या सुमारास पाली येथे दुध विक्रीसाठी व शाळेत जाण्यासाठी आली होती. त्यावेळी तिच्या अज्ञानाचा व लहानपणाचा फायदा घेवून एका अज्ञात इसमाने पळवून नेले, अशी तक्रार तिचे वडील गोविंद कदम यांनी पाली पोलिस स्थानकांत केली आहे. याबाबत पाली पोलिस स्थानकांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाली पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक एन. डी. चव्हाण करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com