सागरी महामार्गाचे दुपदरीकरण; डी पी आर अडीच हजार कोटींचा

सागरी महामार्गाचे दुपदरीकरण; डी पी आर अडीच हजार कोटींचा

रत्नागिरी - सागरी महामार्गाचा डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट (डीपीआर) शासनाला सादर झाला आहे. सुमारे अडीच हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. मार्ग चौपदरीकरणाऐवजी दुपदरीकरण होणार आहे. चार टप्प्यांत ५४० किमीचे काम करण्यात येणार आहे. 

सागरी महामार्ग हा पर्यटन विकासाच्या दृष्टीने केंद्र शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ आहे. रेवस ते आरोंदा असा ५४० किमीचा मार्ग आहे. चौपदरीकरण आणि दुपदरीकरणाचा प्रस्ताव होता. किनारी भागातील जागेच्या अभावामुळे चौपदरीकरणाऐवजी दुपदरीकरण निश्‍चित झाले आहे. 

...याचा असेल समावेश

  • सागरी महामार्गावर ४४ खाडी पूल
  • अतिमहत्त्वाचे २१ पूल 
  • मोठ्या मोऱ्या २२
  • तीव्र वळण, उतार काढणार

चार कंपन्यांद्वारे सागरी मार्गाचा ड्रोन कॅमेऱ्याने ‘डीपीआर’ (डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट) बनविण्यात येत आहे. कोकण पर्यटन विकासासाठी हा सागरी महामार्ग मैलाचा दगड ठरणार आहे. या महामार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला हा समांतर मार्ग होणार आहे.

अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावरून हा मार्ग होणार असल्याने पर्यटन वाढीला मोठी संधी आहे. मांडवा-पोर्ट, रेवस, अलिबाग, मुरुड, डिगी-पोर्ट, बाणकोट, दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, जैतापूर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले असा हा ५४० किमीचा महामार्ग प्रस्तावित आहे.

किनारी भागामध्ये शासकीय जमीन कमी आहे. खासगी जमीनच अधिक प्रमाणात संपादित करावी लागणार आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून कमीत कमी दुपदरी करण्याचे निश्‍चित झाले आहे. तसा अडीच हजार कोटींच्या प्रकल्पाचा डीपीआर राष्ट्रीय महामार्ग विभागाने शासनाला सादर केल्याचे या विभागाने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com