लग्नापूर्वीच्या तपासणीतून अपंगत्वावर मात शक्‍य 

10jan17-malvan
10jan17-malvan

मालवण - अपंगत्व मुळातूनच नष्ट होण्यासाठी आपली धडपड सुरू आहे. पती-पत्नीची तपासणी लग्नापूर्वी करून योग्य मार्गदर्शन केल्यास 99.99 टक्‍के अपंगत्वावर मात करणे शक्‍य आहे, असे मत हेल्पर्स ऑफ दी हॅण्डीकॅप्ड संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती नसिमा हुरजूक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

तालुक्‍यात अपंग पुनर्वसनाचे कार्य सुरू करण्यासाठी श्रीमती हुरजूक आज वायरी येथील हॉटेल रापण येथे आल्या होत्या. या वेळी त्यांनी पंतप्रधानांची भेट होण्यासाठी गेले दोन महिने धडपडत असतानाही भेट मिळत नसल्याची खंत व्यक्‍त केली. या वेळी भूषण साटम उपस्थित होते. 

श्रीमती हुरजूक म्हणाल्या, ""आम्ही सिंधुदुर्गात काजू कारखाना सुरू केला आहे. यात 80 अपंग महिला, पुरुष काम करत आहेत. या ठिकाणी 125 कर्मचारी आपला रोजगार उभा करून मेहनत घेत आहेत. अपंगांना कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही झटत आहोत. ज्या ज्या ठिकाणी अपंग आहेत त्यांना एकत्रित करून त्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. तालुक्‍यातही एक केंद्र सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. अपंगांनी बनविलेल्या वस्तूंनाही बाजारपेठ मिळविण्यासाठी लवकरच एक केंद्र सुरू करणार आहे. स्वप्ननगरी निर्माण करण्यासाठी घेतलेली मेहनत आता अंतिम ध्येयाकडे जात आहे. या ठिकाणी 200 जणांचे पुनर्वसन करण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. आपल्याला तडजोड करून पुढे जाण्याचे मान्य नाही, यामुळे ध्येय निश्‍चित करून चालत आहे.'' 

अपंगांसाठी काम करत असताना अपंग व्यक्‍तींचा सहभाग असलेला काजू कारखाना आम्ही चालवीत आहोत. यासाठी शासनाने एकही रुपयाचे अनुदान दिलेले नाही आणि आम्हाला अपेक्षा नाही. मात्र, आम्ही व्हॅट करातून शासनाकडे जमा केलेल्या सुमारे 40 लाख रुपयांच्या रकमेपोटी शासनाने फक्‍त 17 लाख रुपये परत केले. उर्वरित 22 लाख रुपये अद्याप येणे आहेत. राज्यकर्त्यांच्या पायऱ्या झिजवून आता पुन्हा मंत्रालयाची पायरी न चढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही अपंगांच्या पुनर्वसनासाठी लढत असताता शासनाकडून अपेक्षा सोडाच, पण आमची हक्‍काची रक्‍कम अशा प्रकारे अडकवून ठेवून असहकार्य शासनाच्या यंत्रणेकडून होत आहे. यामुळे शासनाला अपंगांच्या कार्याची जाग येईल त्यावेळी आमचे पैसे परत मिळतील अशी आशा आहे. 
- श्रीमती नसिमा हुरजूक, अध्यक्ष, हेल्पर्स ऑफ दी हॅण्डीकॅप्ड संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com