रायगड जिल्हा उद्योग मित्राची बैठक संपन्न

लक्ष्मण डुबे 
रविवार, 15 एप्रिल 2018

रायगड जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा योजना 1 ऑगस्ट 2016 पासुन लागू झाली आहे. मात्र रसायनीत आणि इतर ठिकाणी लाभार्थी कामगारांना कायम स्वरूपी खास रूग्णालयाची सुविधा नाही.

रसायनी (रायगड) - रायगड जिल्हयातील उद्योजकांची जिल्हा उद्योग मित्राची बैठक जिल्हाधिकारी यांनी अलिबाग येथे गुरुवारी बोलावली होती. या बैठकीला उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा उद्योग मित्रा समितीच्या सदस्या व सचिव एम. एन. देवरस तसेच एमआयडीसी, जिल्हा परिषद, पोलिस, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीत कर्मचारी राज्य विमा योजना लाभार्थी कामगारांसाठी जिल्ह्यात अद्यावत रूग्णालय असावे, आदी मागण्या पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोसिएशनने केल्या आहे. याबाबत उप जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना लक्ष घालण्याचे आदेश संस्थाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. 

रायगड जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा योजना 1 ऑगस्ट 2016 पासुन लागू झाली आहे. मात्र रसायनीत आणि इतर ठिकाणी लाभार्थी कामगारांना कायम स्वरूपी खास रूग्णालयाची सुविधा नाही. त्यामुळे लाभार्थी कामगारांना अधिक उपचारासाठी पनवेल येथे किंवा इतर ठिकाणी जावे लागत आहे. जाताना कामगारांची गैरसोय होत असल्याने रायगड जिल्ह्यात अद्यावत रूग्णालय सुरू करावे. 

रसायनी सावळा मार्गे कोन रस्त्यावरून औद्योगिक क्षेत्रातील, क्षेत्रा बाहेरील कारखान्यांत आणि रसायनी परीसरातील गावांकडे पनवेल, नवीमुंबई, मुंबईहुन येणाऱ्या वाहनांची भरपूर वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर पावसाळयात लवकर खड्डे पडतात आणि वाहन चालकांचे जाताना हाल होतात. वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन या रस्त्याचे डांबरीकरण करावे. 

तसेच पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात बीएसएनएल सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे कारखानदार आणि इतर छोटया व्यावसायिकांची गैरसोय होते. बीएसएनएल कडुन चांगली सेवा मिळावी. वासांबे मोहोपाडा येथील विज महावितरण सहाय्यक अभियंता कार्यालयात कर्मचारी अपुरे आहेत. रिक्त जागांवर नेमणुका कराव्यात तसेच कामाच्या ठिकानी तातडीने पोहोचण्यासाठी आधिकारी, कर्मचारी यांना चार चाकी वाहन मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.

कारखानदारीमुळे पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात वहानांची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण पडत असल्याने डांबरी रस्त्यावर लवकर खड्डे पडतात. त्यामुळे वहान चालकांचे हाल होतात. यावर उपाय म्हणुन एमआयडीसी ते बाँम्बे डाईग पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटने मजबूतीकरण करावे. आदी मागण्या करण्यात आल्या आहे, असे सांगण्यात आले. 

एमआयडीसीने चावणे ते बाँम्बे डाईन्ग रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. तसेच रसायनी ते कोन रस्त्याच्या कामाचा ठेका देण्यात आला आहे. अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली, असे सांगण्यात आले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Meeting of Raigad District Industries Mitra Group