राष्ट्रवादीच्या शक्तिप्रदर्शनात आमदारही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मंडणगड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडणगडात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती चार गणापैकी दोन गणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज भरण्यासाठी तालुक्‍यातून शेकडो कार्यकर्ते आले होते. यावेळी शहरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून राष्ट्रवादीने दोन अर्ज दाखल करीत प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मान मिळवला.

मंडणगड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडणगडात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती चार गणापैकी दोन गणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज भरण्यासाठी तालुक्‍यातून शेकडो कार्यकर्ते आले होते. यावेळी शहरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून राष्ट्रवादीने दोन अर्ज दाखल करीत प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मान मिळवला.

तालुक्‍यात दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती गणासाठी निवडणूक होणार आहे. गुरुवारी सकाळपासूनच जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यानंतर पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत ढोल-ताशांचा गजर करत हजारोंच्या संख्येत कार्यकर्ते येऊन शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आज अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने भिंगळोली गणात नितीन विष्णू म्हामुणकर आणि शिरगाव गणात प्रणिता संदेश चिले यांचे उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी विश्वनाथ वेटकोळी यांच्याकडे सादर केले. राष्ट्रवादीच्या वतीने उमरोली जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण वर्गातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, तर शिरगाव गटातून अनुसूचित जमातीच्या आरक्षणानुसार प्रमोद जाधव यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

उमरोली पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुलतान मुकादम, देव्हारे गणात स्नेहल पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब 
झाले आहे. 

या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुलतान मुकादम, जि. प. सदस्य प्रकाश शिगवण, भाई पोस्टुरे, रमेश दळवी, अनिल रटाटे, वैभव कोकाटे, फैरोज उकये व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 

उमेदवारीचे पत्ते खुले कधी होणार?
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे धूमशान रंगत चालले असून, तालुक्‍यातील राजकीय खेळ्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना, काँग्रेस, बसप, बहुजन परिवर्तन आघाडीने उमेदवारांचे पत्ते अद्याप उघडलेले नाहीत. त्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढली आहे.

कोकण

सावंतवाडी : शहराच्या बाहेर महामार्गावर प्रवाशांना सोडणाऱ्या खासगी बसचालकांना दणका देण्यासाठी सावंतवाडी तालुका...

08.57 AM

महाड - शहरालगत पी. जी. सिटी संकुलातील गोविंद सागर इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये  आज एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याचा...

01.45 AM

रत्नागिरी - कुवारबाव रेल्वेस्थानक येथे गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालकाच्या पोटात सुरी खुपसून खून झाला होता. या खटल्यात आरोपीला...

01.24 AM