विस्कळित मोबाइल सेवेस खासदार जबाबदार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

सावंतवाडी - जिल्ह्यातील बीएसएनएलची मोबाइल सेवा कोलमडलेलीच आहे. वारंवार लक्ष वेधूनही याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बीएसएनएल समितीचे अध्यक्ष असलेले खासदार विनायक राऊत यांचा पुतळा उद्या (ता. 19) तालुका कॉंग्रेसच्या वतीने जाळण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिला. 

हे आंदोलन येथील दूरसंचार कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. या वेळी अधिकाऱ्यांना घेराओ घालून जाब विचारण्यात येणार आहे, असेही श्री. परब यांनी सांगितले. 

या वेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत उपस्थित होते. या वेळी श्री. परब म्हणाले, ""गेला महिनाभर बीएसएनएलकडून देण्यात येणारी मोबाइल तसेच लॅन्डलाइन सेवा विस्कळित आहे. मोबाइल न लागणे, पैसे कट होणे आदी प्रकार घडत आहेत. लॅन्डलाइनची नव्याने लाईन दिली जात नाही. परिणामी त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे. याबाबत मी काल (ता. 17) कार्यालयात जाऊन अधिकारी श्री. कोळी यांच्याशी चर्चा केली. या वेळी नगरसेवक राजू बेग उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत श्री. कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कार्यालयाकडे केबलच नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. उपलब्ध केबलवर सध्याचा डोलारा सुरू आहे. त्यामुळे क्रॉस कनेक्‍शन लागणे, फोन कट होणे आदी प्रकार सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.'' 

प्रशासनावर वचक ठेवण्यास समितीचे अध्यक्ष असलेले खासदार विनायक राऊत कमी पडले आहेत. त्यामुळे राऊत यांच्यासह प्रशासनाला जाग येण्यासाठी उद्या (ता. 19) कार्यालयासमोर पुतळा जाळण्यात येणार आहे. 
- संजू परब, तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस 

Web Title: Mobile service disrupting