सावंतवाडी पालिकेला कर वसुलीतून अडीच कोटी उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सर्वाधिक रक्कम घरपट्टीतून - १०० टक्के वसुली नाहीच

सावंतवाडी - येथील पालिकेने ३१ मार्चपूर्वी घरपट्टी, पाणीपट्टी व दुकान गाळ्यांचे भाडे करवसुली मोहीम राबविण्यात आली. यातून पालिका प्रशासनाला एकूण २ कोटी ५४ लाख उत्पन्न मिळाले आहे.

पालिका प्रशासनाकडून १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षातील करवसुली करण्याचे उद्दिष्ट संबंधित अभियंता व विभागप्रमुखाकडे असते. यानुसार ३१ मार्चपूर्वी थकीत कर वसूल करून त्याची रक्कम पालिका प्रशासनाकडे सादर करावी लागते. सर्वच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीवर्ग मार्च महिना आला की, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या कामकाजात गुंतलेला असतो.

त्यानुसार पालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पाणीपट्टी, घरपट्टी, दुकानगाळे भाडे यातून करवसुलीची मोहीम राबविली. या सर्वातून पालिकेला २ कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यात पाणीपट्टी भरणारे शहरात ३ हजार ४०० ग्राहकांकडून १ कोटी १ लाख रुपयांची अशी ९२.३६ टक्के करवसुली झाली. तर दुकानगाळे भाडे भरणारे ३३७ ग्राहक आहेत. त्यापैकी ९७.६४ टक्के एवढी म्हणजेच २९ लाख रुपये करवसुली करण्यात आली. घरपट्टी भरणारे ९ हजार ४८६ एवढ्या नागरिकांकाकडून ९७.६४ टक्के एवढी करवसुली झाली. 

त्यातून १ कोटी २४ लाख एवढी करवसुली करण्यात आली. अशी मिळून झालेल्या करवसुलीतून पालिकेला २ कोटी ५४ लाख रुपये एवढी रक्कम प्राप्त झाली आहे. नगराध्यक्ष बबन साळगावकर व पालिका मुख्याध्याधिकारी विजयकुमार द्वासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या करवसुलीत पाणीपुरवठा अभियंता संतोष भिसे, विभागाचे डुमिंग आल्मेडा, घरपट्टी विभागाचे मंगेश शिरोडकर, टी. पी. जाधव, नागेश बिद्रे, गजानन परब, बाबा शेख, दिनेश भोसले, आनंद कदम, नीलेश तळवडेकर आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: municila tax recovery 2.5 caror