नगरपालिका अर्थसंकल्प आचारसंहितेच्या कचाट्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

माथेरान - माथेरान नगरपालिकेचा 2017-18 चा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी बोलावलेली स्थायी समितीची बैठक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय नगर परिषदेच्या प्रशासनाने घेतला. माथेरानच नव्हे; तर जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांत हा पेच उद्‌भवला आहे. 

माथेरानमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतके शिक्षक मतदार आहेत. त्यामुळे या कारणाने अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी बोलावलेली स्थायी समितीची बैठकच रद्द करणे योग्य नसल्याची लोकप्रतिनिधींची भूमिका आहे. असे असले तरी तशी तक्रार कोणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा निवडणूक आयुक्तांकडे केलेली नाही. 

महाराष्ट्र नगर परिषद आणि औद्योगिक नगरी कायदा 1965 नुसार कोणत्याही नगरपालिकेचा अर्थसंकल्प 15 जानेवारीपूर्वी स्थायी समितीने मंजूर केला पाहिजे. आवश्‍यक शिफारशी आणि दुरुस्तीसह तो अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवायचा असतो. 28 फेब्रुवारीपर्यंत सर्वसाधारण सभेने हा अर्थसंकल्प मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवायचा असतो. माथेरान नगरपालिकेच्या स्थायी समितीने यासाठी 13 जानेवारी 2017 रोजी बैठक बोलावली होती. ती रद्द करण्यात आली. 

बैठकीची सूचना काढण्यापूर्वी किंवा ही सूचना काढल्यानंतर प्रशासनाने या संदर्भात जिल्हाधिकारी किंवा निवडणूक आयोगाचे स्पष्ट मार्गदर्शन घेणे आवश्‍यक होते; मात्र तसे केले गेले नाही. 

शिक्षक मतदारसंघासाठी लागू असलेल्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी बोलावण्यात आलेली स्थायी बैठक रद्द करण्यात आली. नगराध्यक्षांद्वारे याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तरतुदींबाबत सुस्पष्टता करून घेतली जाईल. 
- डॉ. सागर घोलप, मुख्याधिकारी, माथेरान नगरपालिका.