जंजिऱ्यासाठी आजपासून पुन्हा नौका सेवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

मुरूड - जून ते ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या आदेशानुसार जंजिरा किल्ल्याची जलवाहतूक बंद असते. 1 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी हा जलदुर्ग खुला करण्यात येत आहे.

मुरूड - जून ते ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या आदेशानुसार जंजिरा किल्ल्याची जलवाहतूक बंद असते. 1 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी हा जलदुर्ग खुला करण्यात येत आहे.

जंजिरा पाहण्यासाठी येणाऱ्यांमध्ये विदेशी पर्यटकांची संख्या जास्त असते, असे येथील नावाडी सांगतात. जंजिरा जलवाहतुकीवर 75 कुटुंबांचा चरितार्थ चालतो. याखेरीज खाद्यपदार्थ, शीतपेये, नारळपाणी, बाटलीबंद पाणी विक्रेत्यांना रोजगार मिळतो. दरवर्षी सरासरी अडीच लाखांहून अधिक पर्यटक जंजिऱ्यावर हजेरी लावतात, असे जंजिरा जलवाहतूक संस्थेचे व्यवस्थापक नाझ भाई कादिरी यांनी सांगितले. किल्ला दर्शनासाठी शिडाच्या 15 ते 20 होड्यांतून राजपुरी जंजिरा जलवाहतूक संस्थेमार्फत वाहतूक सेवा उपलब्ध आहे.