शेतकरी-कुळांच्या प्रश्नांसाठी विधानभवनावर धरणे आंदोलन

nagpur
nagpur

पेढे-परशुराम : येथील शेतकरी - कुळांना त्यांचे हक्क व संपादीत जमिनींचा १००% मोबदला मिळणेबाबत आमदार सदानंदजी चव्हाण यांनी आज विधानभवन नागपूर येथे धरणे आंदोलन केले.

कसेल त्याला जमीन मिळालीच पाहीजे, देवस्थान इनाम रद्द झालेच पाहिजे, कुळांना मालकी हक्क मिळालाच पाहीजे, कुळांना १०० % मोबदला मिळालाच पाहीजे, अशा घोषणा देत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.

नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार सदानंद चव्हाण यांनी केलेल्या या आंदोलनामध्ये आमदार राजन साळवी, भरत गोगावले, वैभव नाईक, बालाजी किणीकर, राजेश क्षीरसागर, प्रकाश सुर्वे, प्रकाश आबिटकर, अमित घोडा आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com