युजेस चार्जेसचा निर्णय नागरिकांसाठी जाचक

युजेस चार्जेसचा निर्णय नागरिकांसाठी जाचक

सावंतवाडी - येथील पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या युजेस चार्जेसचा निर्णय नागरिकांसाठी जाचक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत पुर्नविचार करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी व मनसे एकत्र आले.

युजेस चार्जेस रद्द करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करून असा इशारा त्यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिला आहे. शासनाच्या नियमानुसार हा चार्ज आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले.

येथील पालिकेच्यावतीने शहरात राहणाऱ्या लोकांसाठी युजेस चार्जेस आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रत्येक घरासाठी दिवसाला पन्नास पैसे तर हॉटेल आणि लॉज चालकांचा समावेश आहे. या प्रश्‍नावरुन आज दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज नगराध्यक्ष साळगावकर यांची भेट घेवून चर्चा केली. या निर्णयाबाबत पुन्हा एकदा विचार करण्यात यावा. युजेस चार्जेस लोकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे याचा पुन्हा एकदा विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, सत्यजित धारणकर, अगस्तीन डिसोजा, मनसेचे राजू कासकर, अतुल केसरकर, संदीप खानविलकर आदी उपस्थित होते.

अत्याचार प्रकरणी पोलीसांना निवेदन
यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहिक अत्याचार प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांची भेट घेतली. संबंधित मुलीवर झालेल्या अत्याचाराला जबाबदार ठरणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com