देशाच्या कर व्यवस्थेत बदल करण्याची गरज - यमाजी मालकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

सावंतवाडी - आपल्या देशाकडे प्रचंड संपत्ती असूनही पायाभूत सुविधांची प्रगती करता येत नाही. देशात साधनांची संख्या माणसापेक्षा खूप कमी आहे. साधनांचा वापर पुरेसा होत नाही. त्यावर फक्त स्पर्धा होते. देशाची कर व्यवस्था बदलली तरी देश सुधारू शकेल, असे मत पत्रकार तथा अर्थकारणावरील अभ्यासक यमाजी मालकर यांनी येथे व्यक्त केले. 

येथील मातृछाया मंगल कार्यालयात रोटरी क्‍लबतर्फे अर्थक्रांती या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 

या वेळी रोटरी क्‍लबचे विनोद कामत, अनंत उचगावकर, राजू केसरकर आदी उपस्थित होते. 

श्री. मालकर म्हणाले, ‘‘देशात ६ लाख कोटी रुपये व्यवहारात येत नव्हते. हा पैसा बंदावस्थेत राहिला होता. केंद्रीय सरकारचे उत्पन्न ५० लाख कोटी असले पाहिजे ते २५ लाख कोटी आहे. इतक्‍या कमी पैशात देश चालतो आहे. आताच्या करपद्धतीने सरकारची तिजोरी भरत नाही. आपल्या देशात जगाच्या पाठीवर दुसऱ्या क्रमांकाचे सोने तर संपत्तीही प्रचंड असून देशाची प्रगती मात्र करता येत नाही. या देशावर ही वेळ का यावी. संरक्षणावर पैसे खर्च करण्यात देशाचा तिसरा क्रमांक लागतो त्याच देशात गेल्या ३० वर्षांत ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. देशाला आता प्रभावी बॅंकिंगची आवश्‍यकता असल्यामळे पंतप्रधानांनी जनधन योजना लागू केली आहे.’’

Web Title: The need to change the tax system of the country