मिनी ट्रेन ट्रॅकवर येण्याची शक्‍यता धूसर

संतोष पेरणे
शनिवार, 15 जुलै 2017

नेरळ - माथेरानच्या डोंगरात सध्या जोरदार पावसामुळे नॅरोगेज ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती वाहून येत असल्याने हा ट्रॅक आणखी खराब होत चालला आहे. तो सुस्थितीत येण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यातच घाटातील धुक्‍यामुळे मिनी ट्रेन पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्‍यता सध्या तरी अंधुकच आहे. मे 2016 मध्ये झालेल्या किरकोळ अपघातानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने नॅरोगेज ट्रॅक आणि इंजिनासंबंधी दुरुस्तीच्या कामांसाठी मिनी ट्रेन सेवा बंद केली. अमन लॉज-माथेरान शटल सेवाही अद्याप सुरू होऊ शकली नाही.