सिंधुदुर्गात ११,४६९ नवमतदार - उदय चौधरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात ११ हजार ४६९ नवमतदारांची नोंद झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत कर्तव्य व हक्‍काची सांगड घालून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. विशेषतः नवमतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी येथे केले.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात ११ हजार ४६९ नवमतदारांची नोंद झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत कर्तव्य व हक्‍काची सांगड घालून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. विशेषतः नवमतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी येथे केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवारी आयोजित समारंभात श्री. चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर अतिरिक्‍त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण खाडे, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून निवडणूक विभागाने तयार केलेल्या DEO Sindhudurg या फेसबुक पेजचे अनावरण श्री. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तालुकास्तरावर आयोजित केलेल्या वक्‍तृत्व, निबंध तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्राचे वितरण करण्यात आले. तालुका पातळीवरील वक्‍तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची स्पर्धा घेण्यात आली. या जिल्हा पातळीवरील वक्‍तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रेया कुलकर्णी (शिरगाव हायस्कूल), द्वितीय श्‍वेता येनजी (टाक हायस्कूल वेंगुर्ले) व तृतीय ऐश्‍वर्या बल्लाळ (कुडाळ) यांना बक्षिसे देण्यात आली. नवमतदारांना मतदार ओळखपत्रांचे वितरणही करण्यात आले. 

समारंभापूर्वी लेखाधिकारी श्री. थोरात यांनी लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी मराठी शपथ वाचन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण खाडे यांनी नव्याने सुरू केलेल्या फेसबुक पेजची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता नलावडे यांनी केले.

कोकण

सावंतवाडी : 'भाजपाला गि-हाईक पाहिजे. त्यांना दुर्बुद्धी सुचली आहे. त्यामुळे ते नारायण राणे यांना आपल्या पक्षात प्रवेश देत...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

महाड - कोकणात गणेशोत्सवासाठी येणा-या गणेश भक्तांपुढे कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. महामार्गावर...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे. आता पुन्हा जिल्ह्याला चांगले दिवस येणार असा विश्वास...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017