पर्यटनासाठी निर्मल सागर तट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटनस्थळे विकसित झाल्यास देश-विदेशातील पर्यटक आकर्षित होऊ शकतात. याअनुषंगाने लोकसहभागातून निर्मल सागर तट अभियान राबविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज केले.
 
जिल्ह्यात उद्या (ता. 17) पासून 2 ऑक्‍टोबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने निर्मल सागर तट अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. अभियानाची सुरवात सकाळी 7.30 वाजता गावखडी, विजयदुर्ग, देवगड, मालवण व मोचेमाड या पा ठिकाणी होत आहे. या अभियानाअंतर्गत ग्राम, जिल्हा व राज्य स्तरावर इच्छुक घटकांचा सहभाग राहील. त्यामुळे सागर तट स्वच्छ व पर्यटकांसाठी सुखसोयी निर्माण करण्यास, तसेच लोकांना रोजगार उपलब्ध करण्यास हातभार लागेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना हे अभियान यशस्वी करण्याबाबत सूचना दिल्या. बैठकीस जिल्ह्यातील वन विभाग, कृषी विभाग, बांधकाम, मत्स्य व्यवसाय, तटरक्षक दल, तहसील व पंचायत समितीचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Nirmal Sea coast tourism