आम्ही सरस असल्याचे मुख्यमंत्र्याकडून प्रमाणपत्र : नितेश राणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभेत मान्य केले. स्वच्छ सिंधुदुर्ग, शंभर टक्‍के साक्षर सिंधुदुर्ग, तंटामुक्त आणि हागणदारी मुक्त सिंधुदुर्ग हे पुरस्कार कॉंग्रेस पक्षाच्या निशाणीवर निवडून आलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी मिळविले. याचाच अर्थ राज्यभरात आम्ही सरस आहोत, असे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यामुळे गेल्या 15 वर्षातील आमचा कारभार पारदर्शक असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच मान्य केले, असा टोला आमदार नितेश राणे यांनी येथे बोलताना लगावला.

जानवली जिल्हा परिषद मतदार संघातील कॉंग्रेस उमेदवार प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन श्री. राणे यांच्या हस्ते काल झाले. यावेळी ते बोलत होते. 

हुंबरट तिठा येथील कार्यक्रमात तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य सुदन बांदिवडेकर, रंजन राणे, जिल्हा परिषदेच्या उमेदवार श्रीया सावंत, पंचायत समितीच्या उमेदवार भाग्यलक्ष्मी साटम, बिडवाडी पंचायत समितीचे उमेदवार गणेश तांबे, कॉंग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा स्वाती राणे, दत्ता काटे, सुशिल सावंत, हेमंत परुळेकर, सुयोग माणगावकर, राजु हिर्लेकर, दादा भोगले,संदीप सावंत, दर्शन सावंत, दामू सावंत, मंगेश सावंत, परेश सावंत, मकरंद सावंत उपस्थित होते. 

श्री. राणे म्हणाले, ""सक्षम उमेदवार असला तरच गावाचा विकास होऊ शकतो. मतदार संघात विकासकामे आणि शासनाच्या योजना येऊ शकतात. कॉंग्रेसने दिलेला प्रत्येक उमेदवार हा सक्षम आहे. त्याला प्रशासकीय न्याय नाही. जानवली, बिडवाडी मतदार संघ हा कॉंग्रेसच्या विचारांना मानणारा, कॉंग्रेसनेते नारायण राणे यांच्यावर प्रेम करणारा, मतदार आहे. यापुर्वी दिलेला प्रत्येक उमेदवार आपण राणे साहेबांच्या शब्दाखातर निवडून दिला. यावेळीही तो तशाच पद्धतीने निवडून द्या. कोणतेही प्रश्‍न असतील, समस्या असतील तर थेट माझ्यापर्यंत पोहोचवा. मनात किंतु परंतु न ठेवता संवाद साधा. संवादातून विकासाकडे आपण जाऊ. गावाचा आणि समाजाचा विकास करू.'' 

या निवडणुकीत सेना-भाजपचे पदाधिकारी कॉंग्रेस पक्षांतर्गत भांडणे लावण्याचे प्रयत्न करतील. मात्र अशा विरोधकांच्या प्रयत्नांना थारा देऊ नका. प्रत्येक विभागात कॉंग्रेस पक्षाची एकजुट दाखवून 50 जिल्हापरिषद आणि 100 पंचायत समितीवर निर्विवाद कॉंग्रेसचा विजय मिळवा आणि छुपी युती करणाऱ्या सेना-भाजपाला त्यांची जागा दाखवून द्या. 
- नितेश राणे, आमदार

Web Title: Nitesh Rane CM Devendra Fadnavis Sindhudurga