नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) - बांगडाफेक आंदोलन म्हणजे आमदार नितेश राणेंचा हा केवळ फालतूपणा आहे. आमदारकीत मोठी ताकद आहे हे त्यांना कळले नाही हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. आमदारकीची ताकद नेमकी काय असते हे त्यांनी वडिलांकडून शिकून घ्यावे, अशी टीका खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी येथे केली.

पर्णकुटी विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी राऊत बोलत होते. राऊत  म्हणाले, "शिवसेना नेहमी पारंपारिक मच्छीमारांच्या बाजूने राहिली आहे. आयत्यावेळी आमदार नितेश राणे यांना त्यांच्याविषयी निर्माण झालेले प्रेम हे पुतना मावशीचे आहे. यापूर्वी त्यांनी कधी या प्रश्‍नावर वाचा फोडली नव्हती. त्यामुळे त्यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे. काही झाले तरी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्यावर खापर फोडायचे हे राणे कुटुंबियांचे नेहमीचेच तुनतुने झाले आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकारीणीत लवकरच फेरबदल होणार आहेत.'

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब उपस्थित होते.