आता जबाबदारी भास्कर जाधवांकडे  - सुनील तटकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

रत्नागिरी - जिल्ह्यात उत्तर रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत होती. भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्यातील वादाकडे पक्षाचे दुर्लक्ष झाले, ही चूकच झाली. आता पुन्हा ही चूक करणार नाही. जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांच्याकडे आगामी निवडणुकीची सर्व सूत्रे देण्यात येतील. रमेश कदम यांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार नाही. त्यांना वगळूनच राष्ट्रवादी मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. भास्कर जाधव आता बिनधास्त काम करतील, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज येथे दिली. 

पालिका निवडणुकीमध्ये भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्या वादानंतर उत्तर रत्नागिरीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. या बाबत तटकरे यांना छेडले असता ते म्हणाले, ""पालिका निवडणुकीत आम्हाला अपयश आले. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याचा भाजपला नक्कीच फायदा झाला; परंतु या वेळी जिल्हा परिषदेला आम्हाला चांगले यश मिळेल, याची खात्री आहे. राहिला भाग भास्कर जाधव-रमेश कदम यांच्या वादाचा. तो आता संपल्यात जमा आहे. रमेश कदम यांनी त्यांची राजकीय वाटचाल वेगळी केली आहे. त्यांना शुभेच्छा आहेत. आता हे प्रकरण समजुतीच्या पलीकडे गेले आहे.'' 

ते म्हणाले, ""आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची जबाबदारी जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांच्यावर सोपविण्यात येईल. भास्कर जाधव आता सर्वांना बरोबर घेऊन जोमाने काम करतील याची खात्री आहे.'' 

आघाडीसाठी प्रयत्न सुरू 
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेसबरोबर आघाडी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबाबतचा फॉर्म्युला जाहीर होऊन कॉंग्रेस आघाडी म्हणून निवडणुकात सामोरे गेल्यास आघाडी बाजी मारेल, असा विश्‍वास तटकरे यांनी व्यक्त केला.