मतदानासाठी देवरुखातून अधिकारी केंद्रावर रवाना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

साडवली - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मंगळवारी (ता. २१) होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आज आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून सर्व कर्मचारी यंत्रणेसह मतदान केंद्रावर हजर होण्यासाठी रवाना झाले. मतपेटी आणि इतर साहित्याच्या वाहतुकीसाठी एसटी बसेसचा ताफा मैदानावर सज्ज ठेवण्यात आला होता.

निवडणुकीसाठी १ हजार ४१६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तालुक्‍यातील ७ गटांसाठी २७, तर १४ गणांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत. २३६ मतदान केंद्रांमध्ये २९ झोनल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाकडून निवडणूक निर्णय अधिकारी तुषार मठकर व सहायक तहसीलदार संदीप कदम यांनी प्रशिक्षण दिले आहे. देवरूख पोलिस ठाण्यातर्फे निरीक्षक राजेंद्र यादव, संगमेश्‍वरचे महेश थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोकण

सावंतवाडी : होडावडा येथील निसर्गमित्र मंगेश माणगावकर यांच्या बागेत बेडूक,...

11.24 AM

प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा; आज दिल्लीवारी शक्‍य कणकवली / सावंतवाडी -...

07.24 AM

हेलियम वायूचा इथेच लागला शोध : पर्यटकांबरोबरच अभ्यासकांनाही किल्ला घालतोय साद...

05.51 AM