चिंदर पाटणकरवाडी येथे वृद्धाची आत्महत्या

चिंदर पाटणकरवाडी येथे वृद्धाची आत्महत्या

आचरा - तालुक्यातील चिंदर पाटणकरवाडी येथील प्रभाकर दत्ताराम माधव (वय -60) यांनी राहत्या घराशेजारील मळ्यातील लुडब्याच्या जंगली झाडास नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार ते बुधवार सकाळी या दरम्यान घडल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

प्रभाकर माधव हे चिंदर पाटणकरवाडी येथे पत्नीसोबत वास्तव्यास होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील त्यांचा मुलगाही येथे आला होता. प्रभाकर हे मंगळवारी दुपारी घरातून निघून गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते माघारी न परतल्याने मुलगा व शेजार्‍यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. काल सकाळी घरासमोरील मळ्यात शोध घेताना त्यांच्या मुलास झाडास गळफास घेतलेल्या स्थितीत ते दिसून आले. याची माहिती ग्रामस्थ गजानन पाटणकर यांनी आचरा पोलिसांना दिली.

याबाबतचा तपास आचरा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी श्री. शिरगावकर व श्री. चव्हाण करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com