ओणी-पाचल रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पाचल - राजापूर पूर्व विभागातील ओणी-पाचल या रस्त्याचे युद्धपातळीवर डांबरीकरणाचे काम चालू आहे; परंतु होत असलेले  काम निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अण्णा पाथरे यांनी 
केला आहे.

ओणी-पाचल रस्त्याची फार मोठी दुरवस्था झाली होती. अनेक वेळा आवाज उठवून या रस्त्याकडे प्रशासनाचा दुर्लक्ष होत होता. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले होते. अनेक वेळा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर  प्रथम रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम केले; परंतु हे खड्डे भरताना व्यवस्थित न भरता काही खड्डे भरले तर काही तसेच ठेवल्याचा आरोप अण्णा पाथरे यांनी केला. खड्डे बुजवल्यानंतर रस्त्यावर कारपेट टाकण्याचे काम गेली दोन दिवस चालू आहे. धामणपीपासून सुरू केलेले कारपेटचे काम येळवण गावापर्यंत चालू आहे. दोन दिवसांतच कारपेटची खडी उखडून वर आली आहे. या रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.