सह्याद्री शिक्षण संस्थेची टंचाईवर मात

प्रकाश पाटील
शनिवार, 6 मे 2017

सावर्डे - पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनावर अवलंबून न राहता सह्याद्री शिक्षण संस्थेने स्वतः पावले उचलली आहेत. कार्याध्यक्ष शेखर निकम यांच्या कल्पनेतून १० हेक्‍टरहून अधिक जमिनीमध्ये साखळी बंधारे बांधून जलसंवर्धन केल्याने तीन विहिरी, पाच कूपनलिका पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. २० तास पाणी उपसा केला जात असून साखळी बंधाऱ्यामुळेच एवढे पाणी मिळत असल्याचे निकम यांनी सांगितले.

गेली दोन वर्षे प्रायोगिक तत्त्वावर आपल्या संस्थेच्या शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर साखळी बंधारे उभारण्याची संकल्पना त्यांना सुचली. प्रथम गेल्यावर्षी त्यांनी दोन बंधारे उभारले होते. त्या बंधाऱ्याचा चांगला परिणाम दिसून आला. ज्या विहिरींमध्ये मार्चच्या शेवटी खडखडाट व्हायचा, त्याच विहिरी, बोअरवेलमध्ये कडक उन्हाळ्यातही तुडुंब पाणी होते. 

पूर्वीच्या दोन बंधाऱ्याच्या खालील बाजूस त्यांनी आणखी दोन बंधारे व विद्यार्थी वसतिगृहामागे दोन असे सहा साखळी सिमेंट बंधारे बांधले. सध्या सर्वच बंधाऱ्यामधील माती व गाळ उपसा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्येक बंधाऱ्याच्या बांधाकडूून पुढे उतरती खोली केली आहे. तीन हेक्‍टर क्षेत्रात असलेला पहिला बंधारा दोनशे मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि सुमारे वीस फूट खोल आहे. बंधारा खोल व विस्तारित केल्याने आणखी पाणीसाठा होऊ शकेल. सह्याद्रीच्या कृषी परिवारामध्ये सुमारे एक हजार विद्यार्थी राहात असलेली आठ वसतिगृहे, चार खानावळी, चार महाविद्यालये आणि सुमारे पाचशे एकर जमिनीमध्ये लागवड केलेल्या फळबागांना मुबलक पाणी मिळत आहे.