पूल दुरुस्तीसाठी बेमुदत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

पाली - पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावर जांभूळपाडा येथील अंबा नदीवर असलेला जुन्या धोकादायक पुलाची तातडीने दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात यावे, यासाठी "लयभारी आदिवासी विकास संस्थे'ने पाच दिवसांपासून पुलाजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष प्रशांत लाड यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्षा लता कळंबे सोमवारपासून (ता.4) उपोषणास बसल्या आहेत. त्यांची अधिकाऱ्यांशी सोमवारी चर्चा झाली; परंतु पूल दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू केल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा निर्धार कळंबे यांनी व्यक्‍त केला. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी काल (ता. 7) सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पुलाची पाहणी केली. महाडमधील सावित्री नदी पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जांभूळपाडा पुलाचे तातडीने दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात यावे, असे ते म्हणाले.