भुसूरूंगाच्या स्फोटात घरांना गेलेल्या तड्यांचे पंचनामे

अमित गवळे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावानजीक होत असलेल्या दगड खाणीतील भूसुरुंगस्फोटामुळे येथील मंदिरासह शेकडो घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या संदर्भात तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.25) उन्हेरीतील काळभैरव मंदीरात जि.प सदस्य रविंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थीतीत बैठक पार पडली.

यावेळी ग्रामस्तांनी उन्हेरे परिसरात होणारे भुसुरुंग स्फोट (बोअर ब्लास्टिंग) बंद करणे तसेच उन्हेरे मार्गावरुन होणारी वेगवान वाहतुक थांबविण्यात यावी अशी मागणी केली. याबाबत रा.जि.प सदस्य रविंद्र देशमुख यांच्यासह ग्रामस्तांनी पाली सुधागड तहसिलदार बि.एन.निंबाळकर व पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांना याबाबतची तक्रार देऊन काम बंद ठेवण्याची मागणी केली होती. तसेच नुकसानग्रस्त घराचे पंचनामे करुन संबंधितांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ही बैठक संपन्न झाली. 

या भूसुरुंग स्फोटामुळे येथील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे बंद होण्याची दाट भिती ग्रामस्तांनी यावेळी व्यक्त केली. या बैठकीस जि.प सदस्य रविंद्र देशमुख, नंदकुमार देशमुख, सरपंच तुळशीराम महाडीक, अविनाश पवार, सुरेश महाडीक, रविंद्र महाडीक, रामचंद्र देशमुख, तुकाराम जमधरे, सुरेश महाडीक, रमेश वरेकर, अशोक कोळंबेकर, गजानन कानेकर, विलास देशमुख, मनोहर देशमुख, शांताराम भोजने, गिरिष पवार आदिंसह तलाठी नंदकुमार हिंदोळे आदी उपस्थीत होते.

Web Title: panchnama of homes damage due to blast