पासपोर्ट कार्यालय रत्नागिरीत व्हायला हवे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

सावंतवाडी - कोकण विभागासाठी रत्नागिरीत पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी आज खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केली.

सावंतवाडी - कोकण विभागासाठी रत्नागिरीत पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी आज खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केली.

लोकसभेत शून्य प्रहराच्या वेळी त्यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला. पूर्वी जिल्हास्तरावर पासपोर्ट देण्याची व्यवस्था होती. मध्यंतरी याच्या रचनेत बदल करून पासपोर्टसाठी मुंबईत व्यवस्था करण्यात आली. अलीकडे कोल्हापूरलाही शाखा सुरू करण्यात आली आहे; मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील रहिवाशांची यामुळे गैरसोय होत आहे. दरवर्षी फक्त रत्नागिरीतून पासपोर्टसाठी १७ हजार अर्ज येतात. ऑनलाईन अर्ज करण्याच्या पद्धतीचा कोणताही फायदा अर्जदारांना होत नाही. अर्ज पडताळणीसाठी मुंबईत किमान पाच-सहा वेळा जावे लागते. त्यामुळे अर्जदाराला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लोकांना पासपोर्टची सुविधा सहज प्राप्त व्हावी यासाठी कोल्हापूरच्या धर्तीवर रत्नागिरीत पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली.