पाताळगंगा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण

लक्ष्मण डूबे
बुधवार, 30 मे 2018

रसायनी (रायगड) - पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणा-या पराडे ते श्री सिध्देश्वरी या मुख्य रस्त्यावरील पाताळगंगा नदीवरील पुलाचे दुरुस्तीचे काम झाले असुन, संपूर्ण पुल बुधवार (ता 30) पासुन वाहतुकीस खुल्ला करण्यात आला आहे. दरम्यान एमआयडीसीने वेळेच्या दोन दिवस आगोदर काम पुर्ण केल्याने  कारखानदार समाधान व्यक्त करत आहे. 

एमआयडीसीच्या या पुलावरून पाताळगंगा अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तसेच क्षेत्रा बाहेरील कारखान्यांतील आणि वडगाव, इसांबे, माजगाव, जांभिवली, कराडे खुर्द आणि चावणे आदि ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांतील वाहनांची नेहमी वर्दळ असते.

दुरुस्तीच्या कामामुळे कंटेनर, टँकर, ट्रेलर आदि प्रकारच्या अवजड वाहनांना पुलावरून येताना बंदी घालण्यात आली होती. तर इतर हलकी, मध्यम स्वरूपाच्या वाहनांनसाठी एकेरी वाहतुक सुरू ठेवण्यात आली होती. 

पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा पुर्ण करण्यासाठीचा कालवधी पंधरा दिवसाचा होता. मात्र वाहनांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जलद गतीने काम करण्यात आले. दोन दिवस लवकर काम झाले आणि पुल सर्व प्रकारच्या वहानांसाठी खुल्ला करण्यात आल्याने पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कारखानदांरानी समाधान व्यक्त केले आहे. 

Web Title: patalganga river bridge complied