खरोशी गावात दारूबंदीचा ठराव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

पेण - तालुक्‍यातील खरोशी गावातील बिअर बार बंद करावा; तसेच गावठी दारूला आळा घालून पूर्णत: दारूबंदी करावी, असा ठराव ग्रामसभेत मंजूर केला. बिअर बारमुळे गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढून महिलांना उपद्रव होत असल्याने हा ठराव मंजूर करण्यात आला.

मरीआईच्या मंदिरात गणेश जगन्नाथ घरत या तरुणाच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. या ठरावानुसार ग्रामपंचायत हद्दीत दारू विकणारा व दारू पिणारा या दोघांवरही कारवाई करण्यात येईल. यासाठी गावातील 147 ग्रामस्थांनी हात उंचावून सहमती दाखवली. कोणी गावात दारू पिऊन आला तर तक्रारपेटीमध्ये चिठ्ठी टाकून त्याचे नाव पोलिस ठाण्यात कळविले जाईल, असेही ठरावात म्हटले आहे. दारूबंदीसाठी ग्रामसभेने दारूबंदी समिती तयार केली आहे.