कणकवलीत कॅरिबॅग तपासणी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

कणकवली - कणकवली नगरपंचायत क्षेत्रात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. तरीही अनेक विक्रेत्यांकडून कमी जाडीच्या पिशव्या दिल्या जात होत्या. त्या अनुषंगाने नगरपंचायतीने आज सकाळपासून तपासणी मोहीम सुरू केली. यात सहा विक्रेत्यांकडून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

नगरपंचायतीकडून यापुढील कालावधीतही कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. यात जे विक्रेते आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिला आहे.

कणकवली शहरात 26 जानेवारी 2016 पासून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सुरवातीला या बंदीची कडक अंमलबजावणी झाली; मात्र गेल्या चार महिन्यांपासून या बंदीला अनेक विक्रेत्यांनी हरताळ फासला होता. बाहेरून येणारे भाजी आणि फळ विक्रेते राजरोसपणे कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करत होते. त्याबाबत "सकाळ'मधून आवाज उठविण्यात आला होता.

नगरपंचायत प्रशासनाने आज सकाळपासून शहरातील दुकाने, विक्रेते यांच्याकडील प्लास्टिक पिशव्यांचा साठा तपासणी मोहीम सुरू केली. यात सहा विक्रेत्यांकडून तीन किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या सर्व विक्रेत्यांना आज समज देण्यात आली. तसेच यापुढे कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. नगरपंचायतीचे अमोल भोगले, प्रदीप गायकवाड व इतर कर्मचाऱ्यांनी ही तपासणी मोहीम राबविली.

तपासणी मोहीम सुरूच राहणार
शहरातील बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांची तपासणी मोहीम सुरू होताच राष्ट्रीय महामार्ग आणि इतर ठिकाणचे विक्रेते सतर्क झाले होते. यात काही विक्रेत्यांनी कमी जाडीच्या पिशव्या गुंडाळून ठेवल्या आणि 50 मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्यांतून ग्राहकांना भाजीपाला, फळे दिली जात होती. दरम्यान, शहरात प्लास्टिकमुक्‍तीची कडक अंमलबजावणी होण्यासाठी यापुढेही तपासणी मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.