देवगड अर्बनच्या नफ्यात वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

सहकार क्षेत्रातील येथील देवगड अर्बन को-ऑप. बॅंकेला मागील 2016-17 या आर्थिक वर्षात सुमारे 52 लाख 87 हजार इतका नफा झाला आहे. गतवर्षीपेक्षा तिप्पटीने वाढलेला नफा हा बॅंकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व खातेदार यांनी बॅंकेप्रती दर्शवलेल्या विश्‍वासाचे प्रतीक असल्याची कृतज्ञतेची भावना बॅंकेचे अध्यक्ष दिलीप तथा भाई आचरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरत चव्हाण यांनी व्यक्‍त केली.

देवगड - सहकार क्षेत्रातील येथील देवगड अर्बन को-ऑप. बॅंकेला मागील 2016-17 या आर्थिक वर्षात सुमारे 52 लाख 87 हजार इतका नफा झाला आहे. गतवर्षीपेक्षा तिप्पटीने वाढलेला नफा हा बॅंकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व खातेदार यांनी बॅंकेप्रती दर्शवलेल्या विश्‍वासाचे प्रतीक असल्याची कृतज्ञतेची भावना बॅंकेचे अध्यक्ष दिलीप तथा भाई आचरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरत चव्हाण यांनी व्यक्‍त केली.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 31 मार्चअखेर बॅंकेचे 12180 सभासद असून वसूल भागभांडवल 1 कोटी 62 लाख एवढे आहे. बॅंकेकडे 37 कोटीच्या ठेवी असून बॅंकेने 25 कोटी 50 लाख एवढे कर्ज वितरण केल्याने एकत्रित व्यवसाय 62 कोटी 50 लाख एवढा झाला आहे. बॅंकेचे भाग भांडवल पर्याप्तता परिणाम 12.28 टक्‍के असे राहिले आहे. मागील आर्थिक वर्षाचे औचित्य साधून बॅंकेकडे "अर्बन समृध्दी' ही विशेष ठेव योजना सुरू होत आहे. 1 वर्ष कालावधीसाठीच्या ठेवीवर सर्वाधिक 9.25 टक्‍के असा व्याजदर बॅंकेने जाहीर केला आहे. उद्या (ता.8) ते 30 जून असा या योजनेचा कालावधी असून बॅंकेच्या ठेवीदारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. आचरेकर यांनी केले आहे.