कोल्हापूर खंडपीठासाठीचा जनजागृती रथ सावंतवाडीत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

सावंतवाडी - कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी एक खंडपीठ मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. यासाठी जनजागृती रथ आज येथील न्यायालयाच्या आवारात दाखल झाला. या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, अशी मागणी या वेळी उपस्थितांकडून करण्यात आली. 

या वेळी मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठाची मागणी करण्यात येत आहे. ही मागणी कोल्हापूर सिटिझन फोरम, पक्षकार, नागरिक कृती समिती यांच्यातर्फे करण्यात येत आहे. यासाठी जनजागृती व्हावी व गोरगरीब, शोषित व वंचित लोकांना खंडपीठाचा उद्देश व महत्त्व पटवून देण्याकरिता हा जनजागृती रथ कार्यरत आहे. या वेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप नार्वेकर, येथील तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. परिमल नाईक, ऍड. गोविंद बांदेकर, ऍड. सुभाष पणदूरकर, ऍड. संदीप निंबाळकर, ऍड. शामराव सावंत, ऍड. श्रीपाद नातू, ऍड. संदीप राणे, ऍड. धनंजय पेंडूरकर, ऍड. अनिल केसरकर, ऍड. बी. बी. रणशूर, ऍड. नीता सावंत-कविटकर, ऍड. नीलिमा गावडे, ऍड. सुभाष सावंत, ऍड. परशुराम चव्हाण, कोल्हापूर सिनिअर सिटिझन फोरम, पक्षकार, नागरिक कृती समितीचे संस्थापक प्रसाद जाधव, उदय लाड, वैभवराज राजे-भोसले, सलिम पाच्छापुरे, गौरव लांडगे व वकील उपस्थित होते.