गिर्यारोहकांच्या मदतीने रायगडाची स्वच्छता 

सुनील पाटकर
सोमवार, 28 मे 2018

महाड - रायगड विकास प्रधिकरणामार्फत 26 आणि 27 मे रोजी आणि 5 जून अशा दोन टप्प्यात रायगडावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. गिर्यारोहक आणि साहसविरांच्या मदतीने पहिल्या दिवशी साठ पोती प्लॅस्टीक कचरा गोळा करण्यात आला. गडावरील आडवाटा आणि अवघड अलेल्या भागामध्ये देखील ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

रायगड विकास प्रधिकरणामार्फत गडावर रायगड संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. 26 आणि 27 मे रोजी स्वच्छता मोहिमेचे पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. गडावरील कडेकपारी आणि दुर्गम भागातील कचरा साफ करणे अवघड असते त्यामुळे हा कचरा तसाच रहातो. यावेळी गिर्यारोहकांच्या पथकांनी कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू केले. 

या मोहिमेसाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाने या मोहिमेसाठी आवश्यक ते साहित्य पुरविले आहे. सुमित अॅडव्हेंचर्स (कोल्हापूर), मलय अॅडव्हेंचर्स (मुंबई), 32 एम.एस. (मुंबई), हाय रायडर्स, शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच, काल्हापूर माऊंटनेरिंग अँड अॅडव्हेंचर फाऊंडेशन, सेवेशी ठायी तत्पर या गिर्यारोहक आणि साहसी संस्थांनी तसेच सुमारे वीस गिर्यारोहकांनी यात सहभाग घेतला. आता जूनमध्ये या मोहिमेचा दुसरा टप्पा होणार आहे.

Web Title: Raigad cleanliness with the help of mountaineers