शिवराज्याभिषेक उत्सवाला रायगडावर आज प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

रायगड - ऐतिहासिक महत्त्व असणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा सहा जूनला रायगडावर प्रतिवर्षीप्रमाणे अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. याची सुरवात उद्या (ता. 5) सायंकाळी चार वाजता गडपूजनाने होईल.

रायगड - ऐतिहासिक महत्त्व असणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा सहा जूनला रायगडावर प्रतिवर्षीप्रमाणे अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. याची सुरवात उद्या (ता. 5) सायंकाळी चार वाजता गडपूजनाने होईल.

दरम्यान, शिवराज्याभिषेकाच्या स्फूर्तीदायी सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त, इतिहासप्रेमी हजारोंच्या संख्येने रायगडाकडे रवाना होत आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे रायगडावर पाच आणि सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले आहे. खासदार संभाजीराजे, संयोगीताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेकाचे विविध उपक्रम होणार आहेत. महोत्सव समिती, रायगड जिल्हा प्रशासनातर्फे सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.