वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु

अमित गवळे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पाली (रायगड): वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. यामुळे प्रवासी व वाहनचालकांची मोठी गैरसोय होते. परंतु, मागील तीन चार दिवसांपासून या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. या बाबत 'सकाळ'ने वारंवार पाठपुरावा केला आहे.

अवजड वाहनांची सततची वाहतूक, मुसळधार पाऊस यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात देखील होतात. गणेशोत्सवात हे खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजविण्यात आले होते. परंतु, काही दिवसांतच तेथ पुन्हा मोठे खड्डे पडले. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे खड्डे बुजविले जात आहेत. खड्डी, दगड, डांबर वापरुन हे खड्डे बुजविण्यात येत आहेत. परतीच्या पावसामुळे दोन-तीन दिवस हे काम थांबविण्यात आले होते. परंतु, पन्हा एकदा हे काम सुरु झाले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

रुंदिकरणाचे काम करताना सुरक्षिततेचे नियम पाळा
खोपोली-पाली-वाकण रस्ता रुंदिकरणाचे काम सुरु होणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या बाजूची साफसफाई तसेच इतर कामे जेसीबी लावून करण्यात येत आहे. परंतु, हे करत असतांना रस्त्यावरुन जाणाऱया वाहनांना मार्ग दाखविण्यासाठी किंवा वाहने बाजूने काढण्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात येत नाही. तसेच काम सुरु असतांना दोन्ही बाजूला सुचना फलक किंवा इंडिकेटर लावले जात नाहीत. यामुळे अपघात होण्याची शक्यत आहे. अशा वेळी काम करत असताना सुरक्षिततेचे नियम पाळले जाणे गरजेचे आहे.
- ललित ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष, सुधागड तालुका

Web Title: raigad news Barkane-Pali-Khopoli road to repair