पनवेलमध्ये दुहेरी हत्याकांड; सासू-सुनेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

(रायगड): तालुक्यातील नांदगाव गावात घरात घुसून दोन महिलांची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे पनवेल तालुक्यात खळबळ माजली आहे. ही घटना आज (मंगळवार) दुपारी घडली असुन, मृत महिला या नात्याने सासू आणि सुन आहेत. सीताबाई खुंटले (वय 75) व अपर्णा खुंटले (वय 40) अशी मृतांची नावे आहेत.

आज दुपारी अनोळखी व्यक्तींनी घरात घुसून दोघींची हत्या केली. हत्येनंतर अज्ञात व्यक्ती तेथून पसार झाले आहेत. ही हत्या का करण्यात आली, याचा तपास पनवेल शहर पोलिस करीत आहेत.

पनवेल तालुक्यातील नांदगाव येथे मधुकर खुटले हे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. हंत्येच्या वेळी मधुकर खुटले व त्यांचा मुलगा विनीत खुटले (वय 22) हे कामा निमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे सिताबाई आणि अपर्णा या दोघीच घरात होत्या. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास खुटले यांच्या घरातून वाचवा, वाचवा असा आवाज येत होता. शेजारीच राहणाऱ्या सरिता मुकादम यांनी हा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी खुटले यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. खुटले यांच्या घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे त्यांनी दरवाज्याशेजारीच असलेल्या घरातून आत पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सरीता यांना खुटले यांच्या घराच्या मागच्या बाजूने दोन जण पळून जात असताना त्यांना पाठमोरे दिसले. त्यांनी घरात पाहिले तेव्हा सीताबाई आणि अपर्णा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. दोघींच्या मानेवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात दोघींचा मृत्यू झाला आहे.  

या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ सहाय्यक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनीही घटनास्थळाला भेट दिली. मृतदेहाशेजारी तलवार सापडली आहे. शिवाय चॉपरसारख्या हत्याराचे कव्हरही तेथे पोलिसांना आढळून आले. हल्लेखोरांनी दोघांची हत्या करून घराच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडाझूडपातून पळ काढल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून, हत्या कशामुळे झाली याचा तपास पोलिस करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :