मृगगड श्रमदान मोहीम फत्ते

४०-५० किलो वजनी माहिती फलक खालून गडावर नेताना दुर्गवीर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक
४०-५० किलो वजनी माहिती फलक खालून गडावर नेताना दुर्गवीर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक

पाली (जिल्हा रायगड) : दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे गेली दोन वर्ष सुधागड तालुक्यातील भेलिव येथील मृगगड येथे श्रमदान मोहिमांचे आयोजन करण्यात येते. गडावरील पायवाटा स्वच्छ करणे, टाकि साफ करुन पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, दिशादर्शक व माहिती फलक लावणे अशा प्रकारची कामे आजवर पुर्णत्वास नेण्यात आलेली आहेत. रविवारी (ता. 24) गडावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली.

दुर्गप्रेमींनी या मोहिमेत ४०-५० किलो वजनी माहिती फलक खालुन गडावर नेवुन लावला. तसेच गडावरील सोमजाई देवी मंदिराच्या परिसराची साफ सफाई करुन देवीचे पूजन केले ख-या अर्थाने नवरात्र साजरी करण्यात आली. दुर्गवीर प्रतिष्ठान सन २००८ पासून महाराष्ट्रातील दुर्लक्षीत गडकिल्ले संवर्धनाचे कार्य करत आहे.
या मोहिमेत  रामदास घाडी, प्रज्वल पाटील, नितीन पाटोळे, सचिन रेडेकर, प्रशांत घाडीगांवकर, सदानंद रेडकर, सुदर्शन मोहिते, अक्षय देसाई राहुल रोकडे हे दुर्गवीर स्वयंसेवक उपस्थित होते. 

श्रमदानासोबत गडाबाबात जनजागृती व गडाचा प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे. गडाचे महत्व व इतिहास सर्वांसमोर यावा यासाठी स्वयंस्फुर्तीने प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन सकाळच्या माध्यमातून दुर्गवीर अध्यक्ष संतोष हसुरकर यांनी केले आहे. 

शत्रुवर पाळत ठेवण्यासाठी
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावातून पूढे आतमध्ये माणखोर्‍यातुन भेलिव गावालगत मृगगड हा किल्ला आहे. घाट ओलांडुन कोकणात येणार्‍या शत्रुवर पाळत ठेवण्यासाठी शिवरायांना हा किल्ला महत्वाचा वाटला. या किल्यास भेलीवचा किल्ला असेही संबोधले जाते किल्यावर जाण्यास भेलीव गावाकडुन एक तास लागतो. मृगगडावरील बालेकिल्यावर चढण्यासाठी दगडाला खोदुन पायर्‍या केल्या आहेत वर चढतांना उधळा किल्ला व मोराडीचा सुळका पहायला मिळतो. तसेच किल्यावर किल्लेदार व त्यांच्या सहकार्‍यांसाठी बांधलेल्या घरांचे अवशेष, दोन कोठारे याचबरोबर माथ्यावर पायर्‍यांची विहिर व तीन पाण्याची टाकी आहेत. पावसाळ्यात किल्यावर जाणे तसे कठीणच पण आजुबाजुचा निसर्ग मन ओढुन घेतो.

मृगगड संवर्धनासाठी पुढे या
मृगगड संवर्धन व्हावा यासाठि दुर्गवीर प्रतिष्ठानला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे सर्व संवर्धन व सामाजिक उपक्रम हे कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय होतात. दानशुर व्यक्तिंच्या छोट्या मोठ्या देणगीतुन हे सर्व उपक्रम राबवीले जातात. तुम्ही दिलेला एक रुपया सुद्धा चुकिच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची ग्वाही आमचे कार्यच तुम्हाला देईल असे दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे सांगण्यात आले आहे. दुर्गवीर च्या सर्व मोहिमांचे फोटो व माहिती मिळविण्यासाठी भेट द्या. 
वेबसाईट : www.durgveer.com 
फेसबुक पेज : https://www.facebook.com/pg/Durgaveer.warasGadDurganch 
फेसबुक प्रोफाइल : https://www.facebook.com/durgveer 
फेसबुक समूह :- https://www.facebook.com/groups/durgveer/ 
ट्विटर : https://twitter.com/DurgveerPratish
इंस्टाग्राम : Instagram.com/durgveer 
संपर्क - 9833458151 / 8097519700 / 8655823748 
ई मेल : durgveer.com@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com