गाढवाने घेतला सुटकेचा निःश्वास...

शेपटिला बाइंडींग वायर बांधलेल्या गाढवाची गणराज जैन यांनी केली शिताफीने सुटका
शेपटिला बाइंडींग वायर बांधलेल्या गाढवाची गणराज जैन यांनी केली शिताफीने सुटका

शेपटिला बाइंडींग वायर बांधलेल्या गाढवाची गणराज जैन यांनी केली शिताफीने सुटका

पाली (रायगड): बदलापूर रेल्वे स्थानकात गुरुवारी (ता. 23) एक गाढव विचित्र स्थितीत फिरत होते. या गाढवाच्या शेपटीला तीन ते चार ठिकाणी बाईडींग वायर बांधलेली होती. आणि त्या वायरच्या त्रासाने ते गाढव हैराण झालं होत. महाड येथील प्राणिमित्र गणराज जैन यांनी या गाढवाची मोठ्या शिताफीने त्रासा पासून सुटका केली.

गणराज जैन यांना गुरुवारी (ता. 23) दुपारी वांगणी येथील स्वाती बिलीमोरीया यांनी फोन केला. बदलापूर रेल्वे स्टेशन मध्ये एक गाढव विचित्र स्थितीत असल्याचे त्यांनी कळवले. गणराज जैन आणि त्यांची पत्नी डॉ. अर्चना योगायोगाने तेथे जवळच होते. दोघे ताबडतोब घटनास्थळी पोहचले. तिथे पोहचून त्यांनी बघितले की कुणीतरी त्या गाढवाच्या शेपटीला तीन ते चार ठिकाणी बाईडींग वायर बांधलेली होती. आणि त्या वायरच्या त्रासाने ते गाढव पुरते हैराण झाले होते. या सगळ्या प्रकारात ते गाढव क्र. 3 च्या रेल्वे ट्रॅकवर गेले. मात्र, स्वाती बिलीमोरीया यांनी प्रसंगावधानता दाखवून धावत जावून पालेभाज्या आणल्या.  त्या गाढवाला भाज्या दाखवत ट्रॅकवरुन बाहेर काढले. अन्यथा मोठा गोंधळ होऊन अनर्थ झाला असता. त्यानंतर लगेच गाढवाला पकडून बाईडींग वायर तोडण्यात आल्या. या सर्व प्रकारात गणराज यांच्या हाताला थोडी दुखापत झाली. परंतु, गाढवाची मात्र सुखरूप सुटका झाली.

गणराज जैन हे रायगड जिल्ह्यातील महाड जवळ जखमी प्राण्यांसाठी मोफत औषधोपचार व देखभाल केंद्र चालवत होते. या केंद्राचे नाव सफर आहे त्यांना हे केंद्र आता बदलापूर येथे स्थलांतरित करायचे असल्याने सध्या काही दिवसांपासून ते बदलापूर मध्ये राहतात. आत्ता पर्यंत त्यांनी असंख्य जखमी प्राण्यांवर उपचार करून त्यांना जीवनदान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com