महाडः 21 कोटीच्या रक्तचंदन तस्करीतील प्रमुख आरोपीला पकडले

सुनिल पाटकर
सोमवार, 31 जुलै 2017

महाड (रायगड): राज्यभर खळबळ उडवून देणा-या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील 21 कोटीच्या रक्तचंदन तस्करीतील प्रमुख आरोपी इसा हळदेला वनविभागाच्या पथकाने पोलादपूर बसस्थानकात पकडले. रविवारी (ता. 30 जुलै) पहाटे वनविभागाने लावलेल्या सापळ्यात इसा अडकला असून, त्याला 7 दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

चिपळूण शहरातील गोवळकोट भागात 30 डिसेंबर 2016 पासून वनविभागाने छापे घालून विनापरवाना साठवून ठेवलेले रक्तचंदन जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 21 कोटी रुपये आहे. या रक्तचंदन तस्करी प्रकरणी आरोपी इसा जमालुद्दीन हळदे याच्याविरोधात वनविभागाने गुन्हा दाखल केला होता. मात्र, हळदे घटना घडल्यानंतर फरार झाला होता. रक्तचंदन तस्करीचे हे प्रकरण गंभीर व मोठे असल्याने त्याच्या चौकशीसाठी वनविभागासह स्थानिक पोलिस तसेच गुन्हा अन्वेषण विभागाकडेही तपास करण्याच्या दृष्टीने आदेश देण्यात आले होते. वनविभागाचे तपासकार्य सुरु असतानाच इसा हा पोलादपूर येथील बसस्थानकात येणार असल्याची खबर वनविभागाला मिळाल्यावर कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक आणि विभागीय वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानकात शनिवारी रात्रीपासून चिपळूण परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख, वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक उमेश आखाडे, रामदास खोत, आर. पी. बंबर्गेकर सापळा रचून तयार होते.रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास बसस्थानक शेडमध्ये प्रवेश करत असतानाच इसाला वनविभागाच्या पथकाने पकडले. चिपळूण येथील प्रथम वर्ग न्यायालयात इसा याला हजर केले असता 5 ऑगस्टपर्यत त्याला पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

या प्रकरणी इसा याने अटकपूर्व जामिनासाठी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात व मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धडपड चालवली. मात्र, दोन्हाकडे त्याचे अर्ज फेटाळले गेले. अखेर वनविभागाने त्याला जेरबंद केले.

Web Title: raigad news The main accused in the bloodchain smuggling caught