गुलाबी थंडीची चाहुल, दाट धुक्याने रायगडचे वातावरण अल्हाददायक

अमित गवळे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

अारोग्य सांभाळा
थंडीला सुरुवात झाली असली तरी दुपार नंतर वातावराणात उष्मा असतो. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. थंड व उष्ण वातावरणात विषाणुंची वाढ मोठया प्रमाणात होण्याची शक्याता असते. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव यादरम्यान वाढतो.दमा व ऍलर्जीचा त्रास असलेल्यांनी धुक्यातुन जाणे टाळावे. त्वचेची काळजी घेणे आवश्यक. थंडीचा जोर वाढल्यावर खाण्यापिण्यात बदल करणे गरजेचे आहे जास्त उष्मांक असलेले आणि पोषण देणारे पदार्थ या दिवसात खाणे योग्य त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
- डॉ. मयुर कोठारी, फॅमिली फिजिशीयन, पाली

 

पाली (जिल्हा  रायगड) : गर्द हिरवी झाडी, विस्तीर्ण समुद्र किनारा आणि सह्याद्रीच्या लांब रांगा अशा निसर्ग सौदर्याने नटलेल्या रायगड जिल्ह्यात थंडीची सुरुवात होत आहे. पहाटे सर्वत्र दाट धुके पसरत आहे. पहाटे आणि संध्याकाळी गारवा वाढत चालला असून धुक्यामुळे वातावरण अल्हाददायक वाटत आहे. मुंबई गोवा महामार्ग तसेच वाकण पाली खोपोली महामार्गावर पहाटे दाट धुक्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

जिल्ह्यात सर्वत्र तापमानाचा पारा खाली अाला असून किमान तापमान २१ ते २३अंश तर कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. खर्‍या अर्थाने आता गुलाबी थंडीला सुरवात झाली आहे. सकाळी व रात्री वातावरण थंड असते. तर अनेक ठिकाणी दाट धुके पडलेले पहायला मिळते. तरी सुध्दा दुपारी उष्मा जणवतो. थंडी अाणि उष्म्यामूळे साथीचे (थंडी, ताप व खोकला) अाजार वाढत अाहेत. त्यामुळे या वातावरणात अारोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.धुक्यामुळे वाहतूक धिम्या गतीने
मुंबई-गोवा महामार्गावर तसेच वाकण-पाली-खोपोली मार्गावर सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवितांना अडचणी येतात. मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्त्यावरील दुभाजक, खड्डे, फलक, माती-दगड यांचा अडथळा येतो.परिणामी अपघाताचा धोका संभवतो. पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे वाहन चालकांना सोमोरील रस्ता व वाहने निट दिसत नाही त्यामुळे वाहतुक धिम्या गतीने सुरु असते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :