रा.जि.प. शाळा आमटेमचा महाराष्ट्रात नावलौकीक!

"शिक्षणाची वारी" मध्ये चित्ररेखा जाधव यांच्याकडून माहिती तंत्रज्ञानाची माहिती घेतांना शिक्षक. (छायाचित्र, अमित गवळे)
"शिक्षणाची वारी" मध्ये चित्ररेखा जाधव यांच्याकडून माहिती तंत्रज्ञानाची माहिती घेतांना शिक्षक. (छायाचित्र, अमित गवळे)

पाली (रायगड): 'शिक्षणाची वारी' हा राज्यस्तरीय उपक्रम लातूर येथील थोरमोटे लॉन्स मध्ये संपन्न झाला. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमटेम येथील शिक्षीका चित्ररेखा रविंद्रनाथ जाधव यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर सादरिकरण केले. त्यांच्या आय.टी. स्टॉलमधून तीन हजारहून अधिक शिक्षकांनी माहिती घेतली.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शैक्षणिक गुणवत्ता आमटेम शाळेत कशी वाढली याची सर्व राज्यभरातील शिक्षकांना माहीती व्हावी हा शासनाचा या मागील उद्देश. राज्यभर हा उपक्रम राबविला जाणार आहे. विभागवार पहिला ट्प्पा लातूर येथे संपन्न झाला. राज्यभरातून आलेल्या 350 शिक्षकांमधून चित्ररेखा यांची आयटी विभागासाठी जिल्ह्यातून एकमेव निवड झाली.

या राज्यस्तरीय उपक्रमात चित्ररेखा यांनी अध्ययन, अध्यापनात आयटीचा वापर, पालक संपर्क, व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक पेज, शालेय उपक्रमांचे यूट्यूब चॅनेल करून शाळेचे उपक्रम पालकांमध्ये पोहोचवले आहेत. विविध सण, समारंभ, जयंती, पुण्यतिथी, परिपाठ विशेष उपक्रम यांसारख्या अनेक विषयांचे अध्यापन, समाज प्रबोधन, आहार, आरोग्य, स्वच्छतेविषयी मार्गदर्शन, दप्तराचे ओझे कमी करणे, संगणक साक्षरता, अँड्रॉईड मोबाईल व एज्युकेशनल सॉफ्टवेअर अॅप्स, वेबसाईट, ब्लॉग यांची माहिती त्यांनी यावेळी दिली. या माध्यमातून शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती साधता येणार आहे. चित्ररेखा यांनी शिक्षकांना पहिली ते आठवीला विषयानुसार इयत्तेनुसार पालक, शिक्षक यांच्या संपर्कातून विविध एज्युकेशनल अॅप्स द्वारे प्रभावी अध्ययन, अध्यापन कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये 'मित्र' अॅप या शासन अॅपचा विशेष लाभ झाला. या उपक्रमाची अंमलबजावणी करून आम्ही आमच्या शाळा प्रगत करू व शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी पट, उपस्थिती वाढवू असे आश्वासन शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षण प्रेमी, संस्थाचालक, ग्रामस्थ व तंत्रज्ञ यांनी दिले.

रायगड टीममध्ये मुंढाणी शाळेचे विनायक पाटील, डोलवी शाळेचे सुधाकर थळे, आमटेम शाळेचे हिरामण दोरे, पानेड शाळेच्या प्रज्ञा परदेशी यांचा सहभाग होता. या उपक्रमासाठी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, उपशिक्षणाधिकारी सुनील गवळी, पेण गटशिक्षणाधिकारी श्री. कांबळे, सर्व केंद्रप्रमुख पेण यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे सचिव तसेच विद्याप्राधिकरण संचालक, उपसंचालक, आयुक्त, डायट प्राचार्य, अधिव्याख्याते तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी चित्ररेखा जाधव यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com