एसटीच्या संपाने ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल

अमित गवळे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

बस स्थानके ओस
सणासुदीला गजबजलेली बसस्थानके संपामुळे ओस पडली होती.काही तुरळक गर्दी स्थानकांवर पहायला मिळाली. ज्यांना या संपाबद्दल माहित नव्हते ते प्रवासी बस स्थानकात अाले होते. परंतू गाड्याच नाही हे समजल्यावर त्यांनी परतीचा मार्ग पकडला. जो तो मिळेल त्या वाहनांनी इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत होता.

पाली : महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे कर्मचारी सोमवारी (ता.१६) मध्यरात्रीपासून संपावर गेले अाहेत. ऐन दिवाळीत हा संप पुकारल्याने प्रवाशी व चाकरमान्यांचे पुरते हाल झाले. प्रवाशांना खाजगी वाहनांचा अाधार घ्यावा लागला. त्यामुळे खाजगी वाहतुकदारांची मात्र चांगली चंगळ झाली.

शासकिय कर्मचाऱ्यांना, शाळा महाविदयालयांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामूळे अनेक जण अापल्या गावी किंवा इतरत्र फिरण्यासाठी निघाले आहेत. तसेच सुट्टया नसलेले कर्मचारी कामावर निघाले होते. परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेल्याने या प्रवाश्यांची व चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. मुंबई गोवा महार्गावर तसेच बस थांबे व नाक्यांवर वाहनांची वाट बघत प्रवासी तासनतास उभे होते. वृद्ध व महिलांचे खुप हाल झाले. काहीप्रवाश्यांना खाजगी गाड्यांचा अाधार मिळाला. गावागावात जाण्यासाठी मिनिडोअरचा वापर झाला. तर लांबच्या पल्ल्यासाठी खाजगी वाहने उपयोगी अाली. या सर्व गाड्या प्रवाश्यांनी अगदी खचाखच भरुन जात होत्या. परिणामी खाजगी वाहतुकदारांचा धंदा तेजित होता. ऐन दिवाळीत त्यांना जणू बोनसच मिळाला.

बस स्थानके ओस
सणासुदीला गजबजलेली बसस्थानके संपामुळे ओस पडली होती.काही तुरळक गर्दी स्थानकांवर पहायला मिळाली. ज्यांना या संपाबद्दल माहित नव्हते ते प्रवासी बस स्थानकात अाले होते. परंतू गाड्याच नाही हे समजल्यावर त्यांनी परतीचा मार्ग पकडला. जो तो मिळेल त्या वाहनांनी इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत होता.

काॅलेजला सुट्टी लागल्याने अाज घरी जाणार होते. सर्व तयारी सुद्धा केली होती. परंतू एसटीच्या संपामुळे जाणे पुढे ढकलावे लागले आहे.मोठा हिरमोड झाल आहे.
- श्रद्धा दिलीप कासारे, विदयार्थीनी